जळगाव ः महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात (Maharashtra) वारकऱ्यांच्या पायी वारीची परंपरा (Pai Wari Tradition) चालत आली आहे. मात्र दोन वर्षापासून ही परंपरा खंडीत करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हिंदूहृदयसम्राटाचे सुपूत्र असून त्यांनी हिंदूच्याच वारकरी संप्रदायाला पायी वारी काढण्यास मज्जाव केला आहे. इंग्रज व मुगल राजवटीतही पायी वाऱ्या महाराष्ट्रात सुरू होत्या. आताच पायी वारीला परवानगी नाकारून वारकरी संप्रदायाच्या भावनांना छेद दिला आहे असा आरोप वारकरी महामंडळाचे महाराष्ट्राचे सचिव नरहरी महाराज चौधरी महाराज (Warkari Mahamandal Maharashtra Secretary Narhari Maharaj Chaudhary) (आळंदी देवाचे) यांनी आज पत्रकार परिषदेत केला. (warkari mahamandal secretary narhari maharaj allegations against Chief Minister thackeray)

Also Read: वरखेडे-लोंढे बॅरेज प्रकल्पात पाणी आडवण्याचा मार्ग झाला मोकळा

येथील पत्रकार भवनात झालेल्या परिषदेस वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष हभप अंकूश महाराज, हभप श्रीकृष्ण महाराज, वारकरी मंडळाचे संपक प्रमुख हभप दिनकर महाराज, वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष हभप भरत महाराज, नितीन भोळे, भाजपचे मनोज भांडारकर यावेळी उपस्थित होते. हभप चौधरी महाराज म्हणाले, राज्यात १९३६ मध्ये इंग्रज राजवट होती त्यावेळी अशीच महामारी आली होती. तेव्हा इंग्रजांनी वारकऱ्यांच्या पायी वारीला विरोध केला नाही. मुगलांनीही विरोध केला नाही. मुख्यमंत्री हिंदू असताना ते पायी वारीला विरोध करताहेत. आम्ही कोरेानाचे नियम पाळून पायी वारी काढणार होतो. नियम पाळूनही विरोध होत असेल तर राज्यात इंग्रज, मुगलांच्या काळापेक्षा कठीण काळ आला असल्याचे हे उदाहरण आहे.

Wari

मुख्यमंत्र्यांनी महापूजा करू नये..

राजकीय सभा, आंदोलनात तुम्हाला गर्दी चालते. राज्यात अनेक ठिकाणी मंत्र्यांच्या उपस्थितीत पन्नास पेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहतात तेव्हा कोरेाना होत नाही का ? आंदेालनात सर्वच जण सामाजीक अंतर टाळतात, तोंडाला मास्क न लावता घोषणा देतात तेव्हा कोरेाना होत नाही का ? फक्त वारकरी संप्रदायाला वेठीस धरण्याचे काम मुख्यमंत्री करीत आहे. स्वतः मुख्यमंत्री असून दूसऱ्याच्या हातचे बाहुले ते बनले आहेत. त्यांनी पायी वारीला नाकारून पांडूरंगाची महापूजा करण्याची नैतिकता हरविली आहे. नैतीकता असेल तर त्यांनी महापूजा करू नये.
पायी वारी काढून आम्ही व्यवसाय करीत नसतो तर समाजाला सुसंस्कारीत करण्याचे काम पायीवारीत होते. जर यापुढे वाऱ्या, अध्यात्मीक कार्यक्रम यावर बंदी, बंधने आली तर राज्यात व्यापक आंदोलन आम्ही करू.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here