लॉकडाऊनमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत होते. त्यामध्ये काही कलाकार कधी कुकिंग करताना तर कधी ‘होम गार्डनिंग’ करताना दिसत होते. लॉकडाऊनमध्ये काही कलाकारांनी त्यांच्या घराबाहेर फळ आणि भाज्यांची झाडे लावली आहेत. पाहूयात असे काही कलाकार…(celebs flaunt their gardening skills they harvest veggies)

प्रीति जिंटाने तिच्या घराच्या गार्डनचा फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले होते, ‘माझ्या घरामागे मी वेगवेगळ्या प्रकारची फळ झाडे आणि भाज्यांची झाडे लावली आहेत. मी स्ट्रॉबेरी, संत्री, पीच,टोमॅटो,हिरव्या आणि लाल मिरच्या, वांगी, पुदीना, तुळस आणि लिंबू ही झाडं लावली आहेत.’
अभिनेत्री जूही चावलाने तिच्या गार्डनमध्ये मेथी, कोथिंबीर आणि टोमॅटोची झाडं लावली आहेत.
करीना कपूरने मुलगा तैमुर आणि पती सैफचे गार्डमध्ये पेंटिग करतानाचे फोटो शेअर केले होतो. या फोटोमध्ये गार्डमधील वेगवेगळी झाडे दिसत आहेत.
शिल्पा शेट्टीने मुलगा विहानसोबत वांगी तोडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. शिल्पाने तिच्या घराबाहेर अनेक प्रकारच्या फळांची झाडं लावली आहेत.
अभिनेत्री मौनी रॉयने सोशल मीडियावर टोमॅटो आणि पुदीना तोडतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. मौनीने तिच्या घराबाहेरील गार्डनमध्ये फळ आणि भाज्यांची झाडे लावली आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here