कास (सातारा) : कोयना भाग 43 गावं व सह्याद्री माथ्यावरील लोकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेला शिवकालीन राजमार्ग कास पठार ते माचूतर महाबळेश्वर (Kaas Plateau to Machutar Mahabaleshwar Road) हा रस्ता पूर्ववत सुरू रहावा, यासाठी सह्याद्री कोयना संघर्ष समिती (Sahyadri Koyna Sangharsh Committee) 43 गाव यांच्यावतीने सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) व सातारा-जावली आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात असे म्हटले आहे, की कास पुष्प पठारावरून गेलेला शिवकालीन राजमार्ग हा कास ते सह्याद्रीनगर असा बंद असून हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) काळापासूनचा रस्ता असल्याने तो जसा पूर्वी वाहतुकीसाठी व लोकांना येण्या-जाण्यासाठी खुला होता, तसाच तो रहावा. जेणेकरून डोंगरमाथ्यावर वसलेल्या गावातील लोकांना तो ये-जा करण्यासाठी सोईस्कर होईल व पर्यटन वाढीच्या दृष्टीने हा रस्ता खूप महत्वाचा असणार आहे. (Demand From Sahyadri Committee MP Shrinivas Patil To Start Road From Kaas Plateau To Mahabaleshwar)
कास पुष्प पठारावरून गेलेला शिवकालीन राजमार्ग हा कास ते सह्याद्रीनगर रस्ता बंद आहे.
या रस्त्यालगत असणारे सर्व रस्त्यांचे डांबरीकरण हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खूप प्रयत्न करून पूर्ण केले असून कास-बामणोली भागात गावागावांत रस्त्यांचे जाळे विणले आहे. ज्या ठिकाणी रस्ते तयार करणे किंवा डांबरीकरण करणे शक्य नव्हते, अशा सर्व रस्त्यांचे काम शिवेंद्रसिंहराजे यांनी मार्गी लावले आहे. शिवकालीन राजमार्ग खुला करण्याबरोबर कास पठारावरून बामणोलीला जाणारा रस्ता कास धरणाची उंची वाढल्याने वाढीव पाणीसाठ्यामुळे तो रस्ता बाधित होणार आहे, तरी सदरचा हा रस्ता कास ग्रामस्थांनी त्यांच्या मालकी क्षेत्रातून तयार केला आहे. त्याचे खडीकरण व डांबरीकरण कास धरणाचे काम पूर्ण होण्यापूर्वी करून सदर रस्ता वाहतुकीसाठी धरणाचे काम पूर्ण होण्यापूर्वी सुरू करावा. कास पुष्प पठारावरून गेलेला कास ते सह्याद्रीनगर हा रस्ता पूर्वीसाखा खुला खुला करून सह्याद्रीनगर ते गाळदेव या रस्त्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी डांबरीकरण केले आहे.
Also Read: SECC Data : ‘फडणवीसांकडून सभागृहाची जाणीवपूर्वक दिशाभूल’

त्यापुढे वनविभागाच्या हद्दीत अंदाजे १०० ते १५० मीटर रस्ता वनविभागाच्या हद्दीमुळे डांबरीकरण होण्यासाठी राहिला आहे, त्याचे डांबरीकरण तत्काळ करण्यात यावे. हे तीनही प्रश्न खासदार श्रीनिवास पाटील व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी अंधारी-कास उपसरपंच रविंद्र शेलार, बामणोली माजी सरपंच राजेंद्र संकपाळ, सदाभाऊ शिंदकर, के. के. शेलार, संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू किर्दत, दत्ता किर्दत, तानाजी शेलार, फळणी सरपंच संतोष साळुंखे, नीलेश भोसले, संतोष भोसले, दत्ता शिंदे, लक्ष्मण शिंदे, तुकाराम शिंदे सह्याद्रीनगर, बाळा जाधव, विष्णू जाधव, गणपत ढेबे, मंगेश गोरे यासह कास-बामणोली भागातील कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
Demand From Sahyadri Committee MP Shrinivas Patil To Start Road From Kaas Plateau To Mahabaleshwar
Esakal