कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर (NH-4) असणाऱ्या कर्नाटक सीमा (karnataka) तपासणी नाक्यावरून मंगळवारी (13) चिक्कोडीचे पोलिस उपाधीक्षक मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलिस निरीक्षक एस. व्ही. शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी महाराष्ट्रातून (maharashtra) कर्नाटकात जाणाऱ्या कर्नाटक महामंडळाच्या बसेसची तपासणी केली. कर्नाटक महामंडळाची बस पुण्याहून बेळगावला (belgaum) जात होती. या बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांची RT-PCR रिपोर्ट व कोरोना (covid-19) प्रतिबंधक लस घेतल्याच्या दाखल्याची तपासणी करण्यात आली. बसमध्ये एकाही प्रवाशाकडे दोन्ही अहवाल नसल्याने सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटक (kognoli) महामंडळाची बस परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात आली. शेकडो वाहनेही अशाप्रकारे माघारी पाठवण्यात आली.

सीमा तपासणी नाक्यावर अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. या ठिकाणी ट्रक चालक व अन्य वाहनधारकांची रॅपिड तपासणी करण्यात येत होती. सीमा तपासणी नाक्यावर अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी भेट देऊन महाराष्ट्रातून कर्नाटकात येणार्‍या सर्व वाहनधारकांची आरटीपीसीआर रिपोर्ट व कोरोना प्रतिबंध लस घेतल्याचा दाखला पाहूनच कर्नाटकात प्रवेश द्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

Also Read: ‘कोकणातून कोणीही पंतप्रधान झाले तरी शिवसेनेवर काही फरक पडणार नाही’

या सीमा तपासणी नाक्यावर शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पोलिस खाते यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने रॅपिड तपासणी करण्यात येत आहे. रॅपिड तपासणीमध्ये निगेटिव्ह असणाऱ्या लोकांना कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. यावेळी मनोजकुमार नाईक, मंडल पोलिस निरीक्षक शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय एस. ए. टोलगी, विजय पाटील यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

वाहनधारकांची तारांबळ उडाली

कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर अचानक तपासणीला प्रारंभ करण्यात आला. अनेकांकडे कागदपत्रे नसल्याने परत पाठविण्यात येत होते. तपासणी कडक केल्याने चारचाकी व दुचाकी वाहनांची रांग लांबवर लागली होती. कोळी नाक्यावरून शेकडो वाहने परत महाराष्ट्रात पाठविण्यात आली. त्यामुळे वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली होती.

Also Read: बळीराजा सुखावणार! राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here