मुंबई – बॉलीवूडमधील (bollywood) दोन प्रतिभावंत कलाकार आता एकाच चित्रपटात दिसणार आहेत. विशेष म्हणजे ते पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. आपल्या वादग्रस्त विधानांसाठी कंगणा (kangana ranaut) नेहमीच चर्चेत असते. मात्र ती तिच्या अभिनयामुळे देखील प्रसिद्ध आहे. दुसरीकडे प्रख्यात अभिनेता नवाझुद्दीन सिध्दिकी (nawazuddin siddiqui) हा त्याच्या प्रभावी अभियनासाठी सर्वश्रुत आहे. हे दोन्ही कलावंत आता एकत्रितपणे एका चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. (kangana ranaut nawazuddin siddiqui work together in film tiku weds sheru yst88)
बॉलीवूडची क्वीन (bollywood queen) म्हणून कंगणा तिच्या चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेत असते. तिला आतापर्यत तीनवेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नवाझुद्दीनलाही आंतरराष्ट्रीय़ पातळीवरुन वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कंगणानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात तिनं सांगितलं आहे की, आपण नवाझुद्दीन बरोबर चित्रपट करणार आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या नावाची चर्चा होती. चित्रपटाचे नाव ‘टीकू वेड्स शेरू’ (tiku weds sheru) असे आहे.

कंगणानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करताना लिहिलं आहे की, आम्हाला आमचा वाघ मिळाला आहे. आता प्रतिक्षा आहे ती चित्रिकरणाची. या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी हा कंगणाच्या तनु वेड्स मनुचा तिसरा भाग असल्याची चर्चा सुरु केली आहे. मात्र चाहते कंगणा आणि नवाझुद्दीनला पहिल्यांदाच पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. याबाबत नवाझुद्दीनं काही सांगितलेलं नाही.
Also Read: आलिया-रणबीरच्या लग्नाआधीच ठरलं घटस्फोटाचं वर्ष, कुणी केली भविष्यवाणी?
Also Read: अदाकारीपेक्षा ‘नेकलेसचाच’ नखरा, बेलाची कान्समध्ये ‘हवा’
तो म्हणाला होता की, अद्याप नव्या चित्रपटाविषयी चर्चा सुरु आहे. त्याची आम्ही घोषणा करणार आहोत. दुसरीकडे कंगणाच्या सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी तिला आतापासूनच शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, ते कंगणा आणि नवाझुद्दीनला एकत्रित चित्रपटामध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
Esakal