कऱ्हाड (सातारा) : पुणे ते मिरज लोहमार्गाच्या (Pune to Miraj Railway) दुहेरीसह विद्युतीकरण प्रकल्पात बाधित ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करा. त्यातून एकही प्रकल्पग्रस्त शेतकरी वंचित राहू नये, त्याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) यांनी केल्या. पुणे ते मिरज लोहमार्गाच्या दुहेरीसह विद्युतीकरण प्रकल्पाचे (Electrification project) काम सुरू आहे. त्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. (MP Shrinivas Patil Suggestion To Solve The Problem Of Pune To Miraj Railway)

जमिनींचे संपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

प्रलंबित प्रश्नावर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खासदार पाटील यांनी बैठक घेतली. जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh), सारंग पाटील, भूसंपादन अधिकारी संजय आसवले, रेल्वे कन्स्ट्रक्शन विभागाचे उपमुख्य अभियंता सागर चौधरी, योगेंद्र सिंह, जी. श्रीनिवास, कोरेगावचे प्रांताधिकारी ज्योती पाटील, वाईचे प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, कऱ्हाडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे उपस्थित होते. खासदार पाटील म्हणाले, ‘‘रेल्वेच्या मूळ हद्दी कायम कराव्यात. त्याच्या पलीकडे लागणाऱ्या जागेचे सरसकट प्रस्ताव शासनाने तयार करावेत. प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत. त्यांना त्याचा योग्य मोबदला नव्या दराप्रमाणे देण्यात यावा. पूर्वी करण्यात आलेल्या जमीन संपादनाबाबत अनेक शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. त्या अगोदर तातडीने सोडवाव्यात. त्यापासून कुठलाही शेतकरी वंचित राहू नये.

Also Read: तीन आमदार, एक खासदार असूनही ‘राष्ट्रवादी’ला मिळेना ‘जिल्हाध्यक्ष’

MP Shrinivas Patil

तसेच शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरवण्यासाठी रेल्वे लाईन क्रॉस करून पाइपलाइन टाकण्याची व्यवस्था करावी. जमिनींचे संपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्या. त्यांचा सातबारा, गावचा नकाशा, महसूल रेकॉर्ड व रेल्वेचे नकाशे याची खातरजमा करावी. संपादित जमिनीत असणाऱ्या उभ्या पिकांचाही मोबदला शेतकऱ्यांना मिळावा. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न व मागण्या विकास थोरात व अन्य शेतकऱ्यांनी बैठकीत मांडल्या. त्यांनी केलेल्या मागण्या व सादर केलेल्या रेकॉर्डची तपासणी बोरगाव, खराडे, कालगाव व अन्य ठिकाणी जाऊन करावेत. संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा अहवाल दहा दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा, असे श्री. पाटील यांनी सुचवले.

MP Shrinivas Patil Suggestion To Solve The Problem Of Pune To Miraj Railway

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here