तुम्ही पाहिलात का माहीचा नवा लूक…

टीम इंडियाचे अनेक कर्णधार होऊन गेले. त्यापैकी सर्वोत्तम कर्णधार कोण? असं विचारलं तर प्रत्येक जण वेगवेगळी नावं घेईल. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? असा सवाल केल्यास बऱ्याच लोकांच्या तोंडावर नाव असेल ते महेंद्रसिंह धोनीचं. धोनीने टी-२० विश्वचषक, वन डे विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, IPLचे विजेतेपद आणि चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद अशी सर्व विजेतेपदं पटकावली. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर धोनी वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिला आणि नंतर त्याने निवृत्ती जाहीर केली. या निवृत्तीनंतर तो फारसा नजरेस पडला नाही. त्यामुळे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठीही गर्दी करतात. सध्या धोनीचा एक नवा लूक असलेला फोटो व्हायरल झाला आहे. (MS Dhoni New Look Curvy Moustache go viral fans loving new mahi avatar see photos)

Also Read: Video: पार्किसन्सचा ‘सुपर-स्पिन’; पाकिस्तानी फलंदाजही अवाक

धोनीचा व्हायरल झालेला फोटो

T20 World Cup 2007 मध्ये धोनीने लांब केसांची स्टाईल करत विश्वचषक उंचावला. तेव्हापासूनच धोनीच्या विविध स्टाईल्स चाहत्यांना आवडू लागल्या. सध्यादेखील धोनीचा एक भारदस्त मिशी असलेला फोटो व्हायरल झाला आहे. एका ठिकाणी धोनी आपल्या मित्रांसोबत जेवणाचा आनंद घेत आहे. त्या फोटो धोनीची वाढलेली दाढी आणि भारदस्त मिशा चांगल्याच उठून दिसत आहेत. हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून धोनीचा नवा लूक लोकांना चांगलाच पसंतीस उतरताना दिसत आहे.

धोनीचा लेटेस्ट ‘न्यू लूक’

Also Read: मुंबईचा माजी क्रिकेटपटू म्हणतो, ‘धवन T20 World Cup खेळणं कठीणच’

दरम्यान, निवृत्तीनंतर धोनीने IPL 2020मध्ये चेन्नई संघाचे प्रतिनिधित्व केले. या संघाने अत्यंत लाजिरवाणी कामगिरी केली. त्यामुळे संघाला तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर धोनी IPLमधूनही निवृत्त होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण धोनीने त्या चर्चांना हवा दिली नाही. तो IPL 2021मध्येही कर्णधार म्हणून मैदानात उतरला. दुर्दैवाने कोरोनाच्या कारणास्तव IPL चा हंगाम मध्येच बंद करावा लागला. त्यामुळे सध्या धोनी पुन्हा एकदा आपल्या रांची येथील फार्महाऊसवर निवांत वेळ घालवत असल्याचं दिसून येत आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here