नागपूर : महागाईमुळे जनता जांगलीच त्रस्त झाली आहे. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडत आहे. यामुळे गृहिणींचे बजट बिघडले आहे. एकीकडे कोरोनाने जनता त्रस्त झाली असताना महागाईने चांगलेच हाल होत आहे. पेट्रोल, डिझेल व सिलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले. सततच्या भाववाढीमुळे जनता त्रस्त आहे. (Inflation-Prices-of-petrol-diesel-and-vegetables-went-up-The-plight-of-citizens-due-to-inflation-People-suffer-due-to-price-rise)
शहरात पेट्रोलचे दर १०७ रुपयांवर पोहोचले आहे. यामुळे वाहन बाहेर काढावे की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. तसेच डिझेलचे दर ९७ वर पोहोचले आहे.गॅस आज काळाची गरज झाली आहे. मात्र, गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत असून, ९०० रुपये झाले आहे. यामुळे गृहिणींचे बजेट चांगलेच बिघडले आहे.तूर डाळ, चणा डाळ, मुंग डाळचे दर ८ हजार ते ८ हजार ५०० प्रतिक्विंटल झाले आहे. यामुळे टाटातून दाळच दिसेनाशी झाली आहे.सोयाबीन, फल्ली आदी तेलांचे भाव २,४०० ते २,६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तेलाशिवाय भाजी शक्य नसल्याने गरिबांचे चांगलेच हाल होत आहे.सांभार १,८००, टोमॅटो १,७२५, हिरवी मिरची २,६२५, मेथी २,८७५, फुलकोबी १,४२५, पत्ताकोबी १,५७५ असे भाज्यांचे दर प्रतिक्विंटलवर पोहोचले आहे.