तारळे (सातारा) : कोरोना महामारीच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून शाळा, कॉलेज (School, College) व क्लासेस बंद आहेत. हे सर्व टेक्नोसॅव्ही पद्धतीने ऑनलाइन (Online Education) सुरू आहे. शहरी भागात हे बिनधोक सुरू आहे. मात्र, ग्रामीण विभागात याला मर्यादा येत आहेत. बहुतांशी गावात कुठल्याच टेलिकॉम कंपनीचे (Telecom company) व्यवस्थित नेटवर्क येत नसल्याने ऑनलाइन शिक्षणाचा बट्याबोळ सुरू असून, याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. येथील घोट, मुरुड, आंबळे, जवळच्या सुमारे १५ त २० गावांत रेंजची मोठी समस्या असून, ती सोडवावी अशी पालकांतून मागणी होत आहे. (Online Education Stopped Due To Lack Of Network In Karad Area bam92)
एकविसाव्या शतकात सर्व जगात मोबाईल क्रांतीने जग पालटून गेले आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाने सर्व अवकाश व्यापले आहे.
एकविसाव्या शतकात सर्व जगात मोबाईल क्रांतीने जग पालटून गेले आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाने सर्व अवकाश व्यापले आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात टेक्नॉलॉजी आली आहे. शिक्षण विभागही त्यास अपवाद नाही. अनेक शिक्षक टेक्नोसॅव्ही असून टॅब, व स्मार्ट टीव्हीवर शिकविले जात आहे. प्राथमिक शाळेत देखील याप्रमाणे शिक्षण देण्यास काही वर्षांपासून सुरुवात झाली असून, अगदी गाव खेड्यांपर्यंत याचे लोण पसरले आहे. विद्यार्थी या नावीन्यपूर्ण शिक्षणाचा आनंदाने आस्वाद घेत होती. दरम्यानच्या काळात कोरोना महामारीने शाळा बंद पडल्या. मग शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा उतारा काढण्यात आला. घरोघरी आता स्मार्ट फोन आले आहेत. विविध टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कअभावी हे महागडे स्मार्ट फोन केवळ शोपीस बनून राहात आहेत.
Also Read: ठरलं! ZP साठी काँग्रेसचा ‘टाॅप प्लॅन’

आधीच शाळा बंद असल्याने मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जात आहेत. अशात ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. मात्र, अनेक गाव खेड्यांमध्ये नेटवर्क नसल्याने ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. मुलांना घराच्या पत्र्यावर, गच्चीवर, झाडावर जाऊन ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. अडखळत अडखळत कसाबसा तास पूर्ण होतो, मात्र, मुलांना यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सर्व कंपन्यांचे चांगले नेटवर्क मिळणे गरजेचे आहे. अन्यथा ऑनलाइन शिक्षण असून, अडचण नसून खोळंबा असे ठरले आहे. येथील घोट, मुरुड, आंबळे, जवळच्या सुमारे १५ त २० गावांत रेंजची मोठी समस्या असून ती सोडवावी, अशी पालकांतून मागणी होत आहे.
Online Education Stopped Due To Lack Of Network In Karad Area bam92
Esakal