लॉस एंजेलिस: Amazon ने कंपनीच्या कुइपर प्रोजेक्टसाठी (Project Kuiper) फेसबुकमधील डझनभर उपग्रह तज्ञांची टीम घेतली आहे. यामध्ये वायरलेस इंटरनेटमध्ये जे तज्ज्ञ आहेत त्यांना नियुक्त केले आहे. या तज्ज्ञांची मदत Amazon ला कंपनीचे उपग्रह पाठवण्यासाठी आणि अमेरिकेत व परदेशात ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यासाठी भासणार आहे. ही तज्ज्ञांची टीम अॅमेझॉन कंपनीचे कमी कक्षेतील उपग्रहांचे जाळे (low-orbit satellites) तयार करण्यावर लक्ष देणार आहे.

हे सर्व कर्मचारी अमेरिकेतील लॉस एंजेलिस भागात काम करणारे आहेत. त्यामध्ये भौतिकशास्त्रज्ञ, ऑप्टिकल अभियंता, सॉफ्टवेअर अभियंते, प्रोटोटाइप अभियंता आणि यांत्रिक अभियंता यांचा समावेश आहे. ज्यांनी यापूर्वी फेसबूकमध्ये एरोनॉटिकल सिस्टम आणि वायरलेस नेटवर्क्सवर काम केले आहे. सध्या फेसबूक उपग्रहाद्वारे दुर्गम भागात ब्रॉडबँड पोहोचवण्यासाठी (broadband via satellite to remote areas) स्वतःची उपकरणे वापरत आहे.
Also Read: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात मोठी वाढ
अॅमेझॉनला 2020 मध्ये फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनने (Federal Communications Commission) 3 हजार 236 लो अर्थ ऑरबीट सेटेलाईट नेटवर्क चालविण्यास मान्यता दिली होती. या उपग्रहांमुले ब्रॉडबँड सेवा देण्यास मदत होणार आहे. Amazon ने या प्रकल्पासाठी 10 अब्ज रुपये गुंतवले आहेत. 2026 च्या जुलैपर्यंत यातील अर्धे उपग्रह प्रक्षेपित केले जातील व राहिलेले उपग्रह 2029 पर्यंत पाठवले जातील.

Also Read: शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 397 अंश वाढला
सध्या कुइपर प्रकल्पात पाचशे कर्मचारी काम करत असून अॅमेझॉन अजून कामगरांना घेत आहे. फेसबुकच्या दक्षिणी कॅलिफोर्निया-आधारित इंटरनेट कनेक्टिव्हिटीचे माजी प्रमुख जिन बिनस (Jin Bains) आता अॅमेझॉनच्या प्रोजेक्ट कुइपर येथे संचालक असणार आहेत. अॅमेझॉन व्यतिरिक्त स्पेसएक्स (SpaceX) आणि भारती एअरटेलचे वनवेब (Bharti Airtel-backed OneWeb) सारख्या कंपन्या जगातील दुर्गम आणि ग्रामीण भागात ब्रॉडबँड सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
Esakal