रत्नागिरी – हापूस नावाने पल्पची विक्री करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील एका कॅनिंगधारकाला जीआय (भौगोलिक निर्देशांक) मानांकन घ्या, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी नोटीस दिली आहे. यावर्षीपासून मानांकन देणाऱ्या चारही संस्थांकडून जीआयसंदर्भात गांभीर्याने कारवाईचा बडगा उगारण्याचे सूतोवाच केले आहे.
गुरुवारी (ता. 20) अंबर हॉलमध्ये आयोजित केलेल्या हापूस जीआय मानांकन कार्यशाळेत पणन मंडळ आणि आंबा उत्पादक संघाकडून बागायतदारांना विविध प्रकारची माहिती देण्यात आली. मानांकन घेण्यासाठी काय केले पाहिजे, पणनकडून जीआयसाठी कोणत्या सवलती दिल्या जाणार आहेत, याची माहिती दिली गेली.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांतील मिळून 550 आंबा बागायतदारांनी जीआय मानांकन घेतले आहे. त्यांतील 150 बागायतदारांना कार्यशाळेत जीआय सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले. हापूसचे नाव घेऊन विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत कार्यशाळेप्रसंगी आंबा उत्पादक संघाकडून देण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील दोन कॅनिंगधारकांकडून हापूस या नावाचा वापर केला जात आहे. त्यांच्याकडून प्रक्रिया केलेल्या पल्पच्या डब्यांवर हापूसचे नाव वापरण्यात आले आहे; मात्र त्यांनी जीआय मानांकन घेतलेले नाही. गतवर्षीपासून जीआय मानांकन अत्यावश्यक केले आहे. त्यातील एका कॅनिंग उद्योजकाला हापूस ब्रॅण्ड वापरण्यासाठी जीआय घ्या, अशी सूचना देणारी नोटीस देण्यात आली आहे.
दुसऱ्या प्रक्रियादारालाही लवकरच नोटीस दिली जाणार असल्याचे डॉ. विवेक भिडे यांनी सांगितले. ही प्रक्रिया न्यायालयीन असल्यामुळे सद्यःस्थितीत त्या कॅनिंगवाल्यांची नावे जाहीर करण्यात येणार नसल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. ठाणे ते सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांतील आंबा बागायतदारांनी यंदा गांभीर्याने जीआय मानांकन घ्यावे, असे आवाहन केले आहे.
“हापूस’ या नावाचा वापर विक्रीसाठी केला जाणार असेल तर जीआय घेणे अत्यावश्यक आहे. बागायतदारांचा प्रतिसाद वाढत आहे. पहिल्या टप्प्यात कॅनिंगवाल्यांवर अंकुश ठेवण्यात येणार आहे.
– डॉ. विवेक भिडे, आंबा उत्पादक संघ.

News Story Feeds