इचलकरंजी (कोल्हापूर) : गेली २४ वर्षे गणेशमूर्ती घडविण्याचे काम तारदाळ (Tardal) येथील विठ्ठल कुंभार (Vithhal Kumbhar) करतात. नागरिकांचा पाच वर्षांपासून पर्यावरणपूरक संकल्पनेकडे वाढलेला कल लक्षात घेऊन त्यांनी मातीच्या मूर्ती करण्याचा विचार केला. सुरुवातीला तोटा सहन करून १०० पासून ८०० मूर्ती केल्या. ते, यंदा अशा पाच हजार मातीच्या पर्यावरणपूरक मूर्ती घडवत आहेत. त्यातील सव्वाशे मूर्ती इंग्लंडला रवाना होणार आहेत.

कुंभार यांनी २०१७ ला पीओपी मूर्तीसह ७०० मातीच्या मूर्ती केल्या. जिद्दीने प्रवास सुरूच ठेवत त्यांनी २०२० पर्यंत पर्यावरणपूरक मूर्तींची संख्या वाढवली. २०२१ ला मात्र पाच हजार अशा मूर्ती करण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी दहा महिलांना कामात पारंगत करत रोजगार दिला आहे. ते, पीओपी मूर्तीच्या तोडीस तोड आकर्षक कलाकुसरीने पर्यावरणपूरक मूर्ती घडवत आहेत. सुबकतेने मूर्तीवर रंग उमटत आहेत. हे रंग पर्यावरण रक्षणाची बांधिलकी जपणाहे आहेत.

कमी वेळेत, कमी दरात

पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याचे काम अवघड आहे. अधिक मेहनत आणि वेळही जास्त लागतो. अशा स्थितीत कुंभार यांनी कमी वेळेत जास्त मूर्ती घडविण्याचे तंत्र विकसित केले आहे. कमी दरात पूर्यावरणपूरक मूर्ती ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी कुंभार कुटुंबीय आग्रही आहे.

हेही वाचा- ”…. अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू”; संभाजीराजे छत्रपती यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

गणेशमूर्ती घडविण्याचे काम सुरू केल्यापासून पर्यावरणपूरक मूर्तींची परंपरा जिवंत ठेवण्याची धडपड होती. यातूनच यंदा यावर्षी पाच हजार मूर्तींचा टप्पा पूर्ण केला जाणार आहे.

– विठ्ठल कुंभार, मूर्तिकार

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here