अभिनेत्री मंदिरा बेदीचा पती राज कौशलचे कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले. वयाच्या ४९व्या वर्षी राजने जगाचा निरोप घेतला. मंदिराने सोशल मीडियावर पतीसोबतचे काही फोटो पोस्ट करत भावूक पोस्ट लिहिली आहे.

‘२५ वर्षांची एकमेकांना साथ, २३ वर्षांचा संसार.. सर्व संघर्षांतून, आयुष्याच्या चढउतारांमधून एकत्र काढलेला मार्ग’, अशा शब्दांत मंदिराने तिच्या भावना व्यक्त केल्या.
मंदिराने बुधवारी ‘राजी’ या नावाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ‘मिस यू राजी’ असं लिहिलं होतं.
राज आणि मंदिराने १९९९ साली लग्न केलं होतं. या दोघांना तारा ही मुलगी आणि वीर हा मुलगा आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात मंदिरा आणि राजने चार वर्षीय ताराला दत्तक घेतलं. मुलीला दत्तक घेतल्यानंतर मंदिरा आणि राज खूप खूश होते. त्यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली होती.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here