गणपूर (ता चोपडा): दहिवद(ता शिरपूर)येथील रमेश भादू सूर्यवंशी यांनी कराराने शेती (farm) करून लागवड केलेल्या टरबुजात (Watermelon crop) तीन एकरात दोन महिन्यात साडे दहा लाख रुपयांचे उत्पन्न घेतले असून त्यांचे टरबूज दिल्ली (Delhi)व काश्मीर (Kashmir) येथे रवाना झाले आहे.

(jalgaon farmer watermelon farm two month ten lakhs earned)

Also Read: हतनूर धरणाचे दहा दरवाजे बंद; पावसाने घेतली उसंत

सूर्यवंशी यांनी दहा एकर क्षेत्रात टरबुजची 10 मे पासून लागवड केली असून तीन एकरवर स्वतंत्र ,तीन एकर केळीत तर तीन एकर टरबुजची मिरचीच्या पिकात आंतरपीक म्हणून लागवड केली आहे. त्याच्यापैकी तीन एकर क्षेत्रातील मालाची काढणी नुकतीच आटोपली आहे. त्यातून त्यांना 45 टन माल 21 रुपये किलो प्रमाणे तर 10 टन माल 12 रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री झाली असून त्यातून त्यांना दहा लाख पासष्ट हजार रुपयांचे उत्पन्न आले आहे.

Watermelon

व्हीनोरा गोल्ड कंपनीचे बियाणे वापरून त्यांनी अवघ्या साठ दिवसात हा उन्हाळी प्लॉट यशस्वी केला असून त्यांच्या प्लॉट ला अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. टरबुजची शेती भलेही पूर्वी नद्यांमध्ये होत असली तरी नद्या उन्हाळ्यात लुप्त होऊ लागल्यापासून शेत शिवारात होऊ लागली आहे.सूर्यवंशी यांनी आदर्श पद्धतीने पिकवलेल्या टरबुजमुळे त्यांची पीक घेण्याची पद्धत अधोरेखित झाली

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here