नवी दिल्ली : भारतातील पहिले अत्याधुनिक सेवा-सुविधा असलेले गांधीनगरमधील कॅपीटल रेल्वे स्टेशन 16 जुलैला नागरिकांसाठी खूले होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी या स्टेशनचे उद्घाटन करतील आणि त्यानंतर दोन रेल्वे गाड्यांना रवाना होतील. (Modern Look Airport Like Feel See Pics Of India’s 1st Revamped Station)
गांधीनगरच्या कॅपीटल रेल्वे स्टेशनचे पाहा फोटो :
रेल्वे स्थानकांना जागतिक दर्जाच्या 24×7 वाहतूक आणि व्यवसाय केंद्रांमध्ये रूपांतरित करणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत 2016 मध्ये रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाची कल्पना मांडण्यात आली होती. नव्याने पुनर्विकास झालेल्या गांधीनगर रेल्वे स्थानकाचे बर्ड व्ह्यूने दिसणारे दृश्य. स्टेशनची इंटिरियर डिझायनिंग आणि आकर्षक वॉल पेंटिंग स्टेशनच्या सौंदर्यात भर घालत आहे. या रेल्वेस्टेशनवर लक्झरी हॉटेल्स, थीम बेसड लाईटींग आणि आंतरधर्मीय प्रार्थना सभागृह अशा सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत.
रेल्वे स्थानकात पर्यटन स्थळे आणि गुजरातच्या ऐतिहासिक वारसा दर्शविणारी अतिशय आकर्षक भिंत चित्रे तयार केली आहेत.
स्टेशनमध्ये लँडस्केप एरिआद्वारे प्रवेश(Entry) आणि बाहेर पडण्यासाठी (exit)वेगळे मार्ग केले आहे. इतर सुविधांपैकी, स्टेशनमध्ये दिव्यांगांसाठी अनुकूल असे खास तिकिट बुकिंग काउंटर, रॅम्प, लिफ्ट, राखीव पार्किंगची जागा आणि थेट एलईडी वॉल डिस्प्ले लाऊंज असलेली एक राखीव आर्ट गॅलरी आहे, असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. भारतीय रेल्वेवर प्रथमच स्थानकाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर आणि ट्रॅकवर अखंड अॅल्युमिनियमच्या लेअरने छप्पर घातलेले आहेय पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील अत्याधूनिक गांधीनगरमधील कॅपीटल रेल्वे स्टेशनला मॉर्डन लूक दिला असून, सौंदर्याचा अनुभव देणारी इमारत उभारली असून सर्व सोयी सूविधा येथे उपल्बध आहेत. विशेष थीम असलेली लाईटिंग गांधीनगर कॅपिटल स्टेशनला रात्री अतिशय आकर्षक दिसते. ”नागरिकांच्या समाधानासाठी विमानतळ(एअरपोर्ट) च्या बरोबरीने या रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात आला आहे.” अशी माहिती रेल्वे बोर्ड चेअरमन सुनित शर्मा यांनी सांगितले आहे. येथे लक्झरी हॉटेल देखील असून अशी सुविधा देणारे हे देशातील पहिले प्रकारचे रेल्वे स्टेशन आहे.सौंदर्यशास्त्रानुसार तयार केलेल्या इमारतीव्यतिरिक्त आधुनिक प्रवासी सुविधांनी हे स्टेशन सुसज्ज आहे. ”प्रवाशांची संख्या वाढेल तेव्हा, प्रवाशांना आरमदायी प्रवासासाठी करता येईल, असे स्टेशन भविष्यासाठी तयार आहे.” असेही रेल्वेने सांगितले. रंग-बिरंगी लाईटिंगमुळे सुंदर दिसणारे गांधीनगर कॅपिटल स्टेशन नागरिकांच्या समाधानासाठी विमानतळ(एअरपोर्ट) च्या बरोबरीने या रेल्वे स्टेशनचा पुर्नविकास करण्यात आला आहे 16 जुलैपासून नव्याने विकसित झालेले हे गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्टेशन देशाची सेवा देण्यास सज्ज होणार आहे.