आसामच्या गोलाघाट तालुक्यातील पोलिसांनी बुधवारी, गेल्या आठवड्यात 14 वर्षीय मुलाच्या हत्या केल्या प्रकरणी एका पाळीव मादी हत्तीणीला जप्त केले. तसेच मादी हत्तीणीच्या 8 महिन्याच्या पिल्लाला देखील ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ”बोकाखटचे माजी आमदार जितेन गोगोई यांच्या मालकीच्या दुलुमोनी नावाच्या हत्तीणीने 8 जुलैला नाहरजन टी इस्टेटजवळ एका लहान मुलाची हत्त्या केली. या मृत्यूनंतर स्थानिक रहिवाशांनी वन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तीव्र दबाव टाकला होता.”

Also Read: ‘ही राजकीय सूडवृत्तीच’; मानवाधिकार आयोगाच्या रिपोर्टवर ममतांचा पलटवार

”या घटनेविरोधात सेक्शन 304 नुसार हत्तीणीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यांतर्गत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाशी संबधित एका हत्तीणी आणि तिच्या पिल्ल्याला जप्त केले असून वन खात्याकडे त्यांची कस्टडी सोपवली आहे” अशी माहिती बोकाखटचे पोलिस अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली नाही.

एका स्थानिक वनधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सांगितले की, हत्तीणीच्या पिल्ला मिठी मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे हत्तीणीने त्या मुलावर हल्ला केला.हत्तींनी मनुष्यावर हल्ला केल्याची तिसरी घटना असल्याची माहिती समोर आली आहे.

Also Read: नवव्या मजल्यावरून पडली बायको, नवऱ्याने पकडला हात पण…

या प्रकरणाच्या तपासात वन विभागाच कोणताही समावेश नाही. पोलिसांकडे हत्तीणी व त्याची पिल्लू ठेवण्याचे कोणतेही साधन नसल्याने त्यांनी त्यांना आमच्या ताब्यात ठेवले,” अशी माहिती काझीरंगाचे विभागीय वन अधिकारी रमेश गोगोई यांनी दिली.

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प (केएनपीटीआर) चे संचालक पी. शिवकुमार म्हणाले की, हे प्रकरण क्वचितच घडले असले तरी एखाद्या प्रकरणाच्या तपासादरम्यान पुरावे गोळा करण्यासाठी पोलिस किंवा वनविभागाने घरगुती जनावरे जप्त करु शकतात.

Also Read: भारतात तीस लाख मुले धनुर्वात लशीपासून वंचित; WHOचा अहवाल

2013 मध्ये, पेरुंबवूर येथे एका मंदिर उत्सवात तीन महिलांची हत्या झाल्यानंतर केरळमधील वनविभागाने थेचीकोट्टुकाव रामचंद्रन नावाच्या घरगुती (नर) हत्तीला अटक केली होती. हत्तीच्या मालकांना त्यांची सुटका करण्यासाठी 30 लाखांचा बाँड जमा करावा लागला होता.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हत्ती आणि तिच्या पिल्ला धडक दिल्यामुळे वन विभागाने रेल्वे लोकोमोटिव्ह जप्त केल्याची माहिती दिली

बुधवारी राज्यमंत्री वनमंत्री परिमल सुकलाबैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाममध्ये गेल्या 10 वर्षात मानव-हत्ती संघर्षामुळे 812 लोक मरण पावले आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here