पुणे : कोरोना काळात शहरातील औद्योगिक पट्ट्यातील उत्पादनांची निर्मिती थांबल्याने वेअर हाऊसला (गोदाम) असलेली मागणी कमी झाली आहे. मात्र, असे असले तरी गोदामांचे भाडे वाढतच चालले आहे. जिल्ह्यात चाकण (Chakan) मधील गोदामांना सर्वाधिक भाडे असल्याचे ‘नाइट फ्रँक इंडिया’ने केलेल्या (Knight Frank India) ‘इंडिया वेअर हाऊसिंग मार्केट रिपोर्ट २०२१’ अहवालात नमूद आहे. (Chakan Ware houses High Rent Pune District)

चाकण परिसरातील ग्रेड ‘ए’ प्रकारच्या वेअर हाऊसिंगसाठी प्रतिमहिना प्रति चौरस मीटर २६९ रुपये ते ३०१ रुपयांपर्यंत भाडे आकारले जात आहे. त्यानंतर वाघोली परिसरातील (वाघोली-रांजणगाव पट्टा) गोदामाला प्रतिमहिना प्रति चौरस मीटर २१५ रुपये ते ३०१ रुपयांपर्यंत भाडेदराची नोंद झाली आहे. पुण्‍यात २०२० ते २१ या आर्थिक वर्षांत २.८ दशलक्ष चौरस फूट जागेच्‍या व्‍यवहारांची नोंद झाली. तर २०१९- २० मध्‍ये ४.९ दशलक्ष चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर गेली होती. कोविड-१९ मुळे मागणी मधील चक्रियता आणि आर्थिक मंदीमुळे गेल्या आर्थिक वर्षांत गोदामाची मागणी घडली आहे.

Also Read: ‘जिसका माल, उसका हमाल’च्या अंमलबजावणीस देशात प्रारंभ

गेले वर्ष पुण्‍यातील वेअर हाऊसिंगसाठी आव्‍हानात्‍मक ठरले. मात्र, आता औद्योगिक क्षेत्राकडून चांगली मागणी होत आहे. पूर्वी फक्‍त ऑटोमोबाइल क्षेत्राकडून गोदामाचा वापर होत होता. आता इतर प्रकारच्या उत्पादकांना देखील वेअर हाऊसची गरज भासत आहे. पुणे शहरात देशातील इतर कोणत्‍याही शहरांच्‍या तुलनेत परिपक्‍व उत्‍पादन केंद्राची इकोसीस्टम आहे.

– परमवीर सिंग पॉल, पुणे शाखा संचालक, नाइट फ्रँक इंडिया

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here