विशेष म्हणजे या वैशिष्ट्यामुळेचे या गावाचे नावही ‘सार्शी गाईची’ असेच पडले आहे.

तिवसा (अमरावती) : गाईचे (cows) महत्त्व विविध पातळ्यांवर सांगितले जात असतानाच तिवसा तालुक्यातील सार्शी (Sarshi) या गावात गाईंना विश्रांतीसाठी चक्क गाद्या (Mattress) टाकण्यात येतात. गावात गाईचे मंदिर असून सतराव्या शतकापासूनच गाईची मनोभावे पूजा केली जाते. विशेष म्हणजे या वैशिष्ट्यामुळेचे या गावाचे नावही ‘सार्शी गाईची’ असेच पडले आहे.

Also Read: अमरावती जिल्ह्यातील जि.प.च्या शाळांना मिळेना हक्काचे छप्पर

गाईंचे महत्त्व अधोरेखित करणारे तिवसा तालुक्यातील सार्शी गाईची या गावाची ओळख सर्वत्र आहे. माणसाने मुक्या प्राण्यांना जितके प्रेम दिलं त्याच्या कितीतरी पटीने मुके प्राणी माणसाला प्रेम देतात. त्यामुळेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनात मुक्या प्राण्यांवर दया करण्यास सांगायचे. संतांचा तो संदेश पाळत तिवसा तालुक्यातील सार्शी गावात अनेक वर्षांपासून गाईचे पूजन करण्याची परंपरा आहे. गावाच्या अगदी मध्यभागी पार्वती माता संस्थानचे गाईचे मंदिर असून येथे जिल्ह्यातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.

Also Read: अमरावती विभागात डेंगीच्या रुग्णसंख्येत घट, तीन वर्षांत फक्त पाच बळी

ग्रामस्थ या मंदिराविषयी अनेक गोष्टी सांगतात. एका गाईपासून झालेले तिचे वंशज अजूनही गावात फिरतात व त्यांची पूजा, तसेच व्यवस्था ग्रामस्थांकडून केली जाते. दीड हजार लोकसंख्येच्या या गावातील प्रत्येक घरात गाईची प्रतिमा पाहायला मिळते. एवढेच नाही तर पौष पौर्णिमेला मंदिरात पुण्यतिथी, भागवत सप्ताहाचेही आयोजन केले जाते.

Also Read: अमरावती रेमडेसिव्हिर काळाबाजार : कंत्राटी डॉक्टरसह पाच जणांची हकालपट्टी, दोघांना जामीन

एका गाईपासून झालेली वंशाची वाढ आज दहा गाईंपर्यंत पोहोचली आहे. यातील सहा गाईंचा मृत्यू झाला असून त्यांना मंदिराला लागूनच समाधी देण्यात आली आहे. या वंशातील चार गाई सध्या या गावात वास्तव्याला आहेत. गावातील प्रत्येक जण गाईची विशेष काळजी घेतो. त्यांना बसण्याकरिता गादीचे आसन दान करतात तसेच मोकाट जनावरे व कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांकरिता गावात गोरक्षण तयार करण्यात आले आहे.

Also Read: संचारबंदीत रस्त्यावर आरटीपीसीआर चाचणी; अमरावती महापालिकेचा उपक्रम

गायीला हिंदू धर्मात पवित्र असे स्थान आहे. गावात एक बेलाचे झाड होते, त्याच झाडाखाली गाय बसायची. त्यानंतर तिचे निधन झाले. त्याच ठिकाणी तिचे मंदिर बांधण्यात आले.

– सोमेश्वर मंजू, विश्वस्त, सार्शी.

राज्यभर कीर्तन करणारे आळंदीचे दिलीप महाराज आळंदीकर यांनीसुद्धा या मंदिराची प्रशंसा केली, गाईचे मंदिर हे कुठेच नाही, मात्र या छोट्याशा गावात गाईचे मंदिर आहे व याला मोठे महत्त्व आहे.

– पद्माकर वानखडे, अध्यक्ष, पार्वतीमाता देवस्थान, सार्शी.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here