देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिरतेकडे जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांच्या आत नोंदली जात आहे.

india corona update नवी दिल्ली- देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिरतेकडे जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांच्या आत नोंदली जात आहे. गेल्या 24 तासांत देशात 38 हजार 949 नव्या कोरोनोबाधित रुग्णांची नोंद झाली, तर 40 हजार 026 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत देशात 542 लोकांना विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला. आरोग्य विभागाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (india corona update today Health Ministry)

भारतात आतापर्यंत 3 कोटी 10 लाख 26 हजार 829 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 3 कोटी 01 लाख 83 हजार 876 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सध्या कोरोनाचे 4 लाख 30 हजार 422 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना विषाणूने देशातील 4 लाख 12 हजार 531 लोकांचा आतापर्यंत जीव घेतला आहे. देशातील रिकव्हरी रेट 97.28 टक्के झाला आहे. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या 1.39 टक्के आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

corona testing

कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरणाला सुरुवात करण्यात आलीये. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 39 कोटी 53 लाख 43 हजार 767 लोकांनी कोरोना प्रतिबंधल लशीचा किमान एक डोस घेतला आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात 44 कोटी 23 हजार 239 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. 15 जुलैला 19 लाख 55 हजार 910 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी

राज्यात गुरुवारी 8 हजार 010 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 61 लाख 89 हजार 257 झाली आहे. राज्यात एकूण 1,07,205 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात नियंत्रणात आलेला मृत्यूचा आकडा पुन्हा वाढला. राज्यात 170 रुग्ण दगावले. मृतांचा एकूण आकडा 1 लाख 26 हजार 560 वर पोहोचला आहे. दिवसभरात 7 हजार 391 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 59 लाख 52 हजार 192 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.17 टक्के एवढे झाले आहे.

corona update

8 राज्यात कडक लॉकडाउन –

देशातील 8 राज्यांमध्ये कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिसा, तामिळनाडू, मिजोरम, गोवा आणि पुडुचेरी या राज्यांचा समावेश आहे. या राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

23 राज्य/केंद्रशासित प्रदेशांत आंशिक लॉकडाउन

देशातील 23 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आंशिक लॉकडाउन लावण्यात आलेला आहे. येथे निर्बंधासोबत सूट देण्यात आली आहे. काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्यामुळे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. छत्तीसगढ, कर्नाटक, केरळ, बिहार, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू-कश्मीर, लडाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, मेघालय, नगालँड, आसम, मणिपूर, त्रिपुरा, आंध्रप्रदेश आणि गुजरात या राज्यात आंशिक लॉकडाउन लावण्यात आलेला आहे.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here