दोन लहान मुलांनी गमावले वडिलांचे छत्र

नालासोपारा: लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक टंचाईला कंटाळून विरारमध्ये एका नामवंत हॉटेल व्यवसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिट्ठी ही लिहून ठेवली होती. त्यात काही जणांच्या नावांचा उल्लेख असल्याची माहिती आहे. पण पोलिसांनी त्या चिट्ठीतील मजकूर गुप्त ठेवला आहे. त्यामुळे आत्महत्येमागील खरं कारण काय, अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही. याबाबत प्राथमिक माहितीनुसार, अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे. करुणाकरण पुत्रन असे या आत्महत्या केलेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. त्यांचे वय 48 वर्षे होते. पुत्रन यांना दोन लहान मूलं असून या मुलांना वडिलांचे छत्र गमवावे लागले. (Virar Hotelier commits suicide due to Thackeray Govt imposed lockdown restrictions)

Star-Planet-Hotel

Also Read: ‘टी सिरिज’च्या भूषण कुमारांवर अंधेरीत बलात्काराचा गुन्हा दाखल

विरार पश्चिम येथील वाय के नगर परिसरात असलेल्या स्टार प्लॅनेट या हॉटेलचे संचालक करुणाकर पुत्रन (48) यांचा मृतदेह गुरूवारी सकाळी 9 च्या सुमारास हॉटेलमधील छताला लटकलेला दिसला. अर्नाळा सागरी पोलिसांना वर्दी मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलिसांना या ठिकाणी एका चिट्ठी मिळाली. त्या चिट्ठीत, ‘अनेक दिवसांपासून हॉटेल चालत नसल्याने आर्थिक तंगी निर्माण झाली होती. हॉटेल मालकाचे भाडे थकले होते. लाईट बिल भरायला पैसे नव्हते, कामगारांचा पगार निघत नव्हता. हॉटेल मालक भाड्यासाठी तगादा लावत होते. या सर्व आर्थिक टंचाईला कंटाळून आत्महत्या करत आहे’, अशा आशयाचे पत्र लिहिले असल्याची कुजबूज ग्रामस्थांमध्ये आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here