बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरने (kareena kapoor) २१ फेब्रुवारी रोजी चिमुकल्या पाहुण्याला जन्म दिला. करीना सोशल मीडियावर तिच्या मुलाचे फोटो पोस्ट करताना विशेष काळजी घेतली आहे. कोणत्याही फोटोमध्ये तिने चेहरा दाखवलेला नाही. पण आता करीनाच्या एका फॅनक्लबने करीनाच्या छोट्या मुलाचे म्हणजेच ‘जे’ (jeh) चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानीने देखील करीना आणि तिच्या मुलाचा फोटो शेअर केला. मानवने या फोटोला कॅप्शन दिले, ‘आई करीना कपूर खानसोबत क्यूट लिटल जे’.

सैफ व करीनाने २०१२ मध्ये लग्न केलं. ‘टशन’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. गरोदरपणादरम्यान करीना चित्रपटाचे शूटिंग, जाहिरातींसाठी काम करत होती.

करीनाच्या ‘प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्कामध्ये ‘जे’चा फोटो आहे अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. करीनाच्या एका फॅनक्लबने देखील करीना आणि ‘जे’ चे अनसिन फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिले, ‘आम्हाला करीनाच्या पुस्तकामधून काही अनसिन फोटो मिळाले आहेत. एका फोटोमध्ये तैमुर आणि दुसऱ्या फोटोमध्ये जे आहे.’
काही दिवसांपुर्वी रणधीर कपूर यांनी ‘ई टाइम्स’शी बोलताना सांगितले होते, ‘करीना-सैफने त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव जे (Jeh)ठेवलंय”
‘मदर्स डे’च्या निमित्ताने तिने तैमुर आणि त्याच्या छोट्या भावाचा फोटो पोस्ट केला होता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here