मुंबई – बिग बॉसच्या 14 व्या सीझनमध्ये राहुल आणि दिशा परमार यांच्या अफेयरची चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. त्या स्पर्धेमध्ये दिशा परमार आणि राहुल वैद्य यांचे वेगवेगळे किस्से व्हायरल झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. दोघांच्या घरच्यांनाही त्याबद्दल माहिती होते. मात्र लग्नाची तारीखही ठरली नव्हती. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्याला चाहत्यांचा प्रतिसादही मिळाला आहे.(rahul vaidya disha parmar wedding inside pics viral yst88)दिशानं (disha parmar) वधूच्या वेशभूषा करताना लाल रंगाचा लग्नाचा जोडा परिधान केला होता. त्यात ती कमालीची सुंदर दिसत होती.






Esakal