जळगाव ः जळगाव जिल्ह्यातील चोपडा (chopda) तालुक्यातील सातपुडा (satpuda) डोंगररांमधील दुर्गम भागात आज चारच्या सुमारास हेलीकाॅप्टरला अपघात (Helicopter crash) झाल्याची घटना घडली. हे हेलीकाॅप्टर प्रशिक्षणार्थी असल्याचे समजते तर या घटनेत हेलीकाॅप्टरमधील दोन जणांचा मृत्यू (Death) झाल्याची माहिती प्रार्थमिक माहिती समोर येत आहे.
( jalgaon district satpuda hills helicopter crashes )

चोपडा या गावापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या उनपदेव जवळील वर्डी या गावापासून ३ किलोमीटर अंतरावर सातपुड्या पर्वत रांगामधील जंगलात दुपारी हेलिकॉप्टर कोसळे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस प्रशासन तसेच शासकीय प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून अतिशय दुर्गम भाग असल्याने मदत कार्य करण्याच अडचणी येत आहे.
– या घटनेची सविस्तर वृत्त काही वेळात बातमीत अपडेट होईल..
Esakal