बिग बॉसमध्ये सतत आपल्या वादांमुळे शहनाज गिल ही सर्वांच्या चर्चेत राहिली. त्याला कारणही म्हणजे तिचा स्वभाव. आपल्याला कुणी काही बोलले तर जशास तसे उत्तर देणारी अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.
शहनाजचा एक फोटो फॅशन मॅगझीनच्या कव्हरवर छापण्यात आला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तिनं सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहणं पसंत केलं आहे.
शहनाजचे ते फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी त्यावर आपली पसंती दर्शवली आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड सुरु केले आहे. ट्विटरवर #ShehnaazGillTheNextBigThing आणि #ShehnaazGill ट्रेंड होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर शहनाजला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी तिनं एक व्हिडिओ देखील शेयर केला होता. त्यालाही प्रेक्षकांची दाद मिळाली होती. त्या व्हिडिओमध्ये ती इंग्लिश गाणं म्हणताना दिसते. इंस्टाग्रामवर त्या व्हिडिओला 18 लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले होते.
शहनाज आता लवकरच पंजाबी गायक अभिनेता दिलजीत दोसांज बरोबर हौसला रख नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 15 ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here