नवी दिल्ली: क्लबहाउस या ऑडिओ सोशल मीडिया ऍपने ‘बॅकचॅनल’ (Backchannel) नावाचे एक नवीन चॅट फीचर आणले आहे. क्लबहाऊसच्या (Clubhouse) अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये क्लबहाउसने म्हटलं आहे की, ‘आमच्या प्रिय इंजिनिअर टीमने तयार केलेले युजर्ससाठी नवीन क्लबहाऊस बॅकचॅनल फिरच सादर करीत आहे’

हे फिचर यजर्सना इतर लोकांना मजकूर संदेश (text messages) पाठविण्याची परवानगी देते. युजर्स या फिचरमुळे आता चॅट ग्रुपही तयार करू शकतात. पण यामध्ये सध्यातरी फोटो किंवा व्हिडीओ पाठवण्याची सोय नसणार आहे. पण याद्वारे तुम्ही फोटो किंवा व्हिडीओची लिंक पाठवू शकता.

क्लबहाउस आवाजावर आधारित सोशल मीडिया अ‍ॅप आहे

जर तुम्ही स्पिकर किंवा ऍपद्वारे बोलत असाल तर ज्यांच्यासोबत बोलत आहात त्यांना पुढे काय विचारायचे याबद्दल तुम्ही तुमच्या सोबतच्या व्यक्तिंना या फिचरद्वारे चॅट करू शकाल. जर तुम्ही श्रोते असाल तर तुम्ही प्रेक्षकांमधील इतर लोकांशी या चॅटद्वारे चॅट करू शकाल.

जर आपण स्पीकर असाल तर आपण लोकांकडून मेसेजद्वारे प्रश्न घेऊ शकता आणि प्रेक्षकांकडून कोणाला कॉल करायचे हे ठरवण्यासाठी ते वापरू शकता. आपण एखादा श्रोता असल्यास, आपण स्टेजवर येऊ शकत नसलात तरीही आपण प्रश्न सबमिट करू शकता.

या ऍपमध्ये नवीन युजर्स ‘रूम’ (club) म्हणजे ग्रुपमध्ये मध्ये सहभागी होऊ शकतात

क्लबहाउस आवाजावर आधारित सोशल मीडिया अ‍ॅप आहे. क्लबहाउसवर क्लब/ग्रुप तयार करून एकमेकांशी बोलू शकता जसं तुम्ही व्हाट्सऍपवर ग्रुप व्हिडिओ कॉल करता तसेच इथंही तुम्ही ऑडिओ कॉल करू शकता. येथे तुम्ही व्हाट्सऍपसारखे ग्रुप/क्लब तयार करून एकमेकांशी बोलू शकता. क्लबहाउस मध्ये ग्रुपला क्लब बोलले जाते.

या ऍपमध्ये नवीन युजर्स ‘रूम’ (club) म्हणजे ग्रुपमध्ये मध्ये सहभागी होऊ शकतात. त्याठिकाणी तुम्ही डिजिटल मार्केटिंग, बातम्या किंवा अन्य इतर विषयांवर चर्चा करू शकता. अगदी विद्यार्थ्यांची आंदोलने किंवा बिटकॉइनसारख्या विषयांवरही तिथे चर्चा होते. तिथे तुम्ही तुमचं मतही मांडू शकता किंवा इतरांचे फक्त विचार ऐकायचे असतील तर तसाही पर्याय यामध्ये आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here