ढेबेवाडी (सातारा) : मराठा समाजाला (Maratha Community) न्याय मिळण्यासाठी शासनाचे लक्ष वेधत असताना सोलापूर व अन्य ठिकाणी मराठा आक्रोश मोर्चाच्या (Maratha Akrosh Morcha Solapur) कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मात्र, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करणारे काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole), अशोक चव्हाण (Ashok Chavan), भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्यावर त्यांनी गुन्हे दाखल केलेत का?, असा सवाल माजी आमदार नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी नवी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत करत मराठा समाजाबद्दल मुख्यमंत्री जराही संवेदनशील राहिलेले नाहीत, असा आरोपही केला. (Narendra Patil Criticism Of Nana Patole Ashok Chavan And Bhai Jagtap In Navi Mumbai bam92)

आम्ही मराठ्यांच्या प्रश्नी मोर्चा काढला की, कोरोना होतो आणि त्या नेत्यांनी इंधनप्रश्नी काढल्यावर कोरोना होत नाही का?, असा सवाल नरेंद्र पाटील यांनी सरकारला केला आहे.

सोलापूर येथील आक्रोश मोर्चानंतर मराठा आरक्षण (Maratha Reservation) व विविध प्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी (ता. १८) मुंबईत मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून पाटील म्हणाले, ‘कोरोनाचे कारण देवून सोलापुरात आमचा मोर्चा अडविला, गुन्हे दाखल केले. आम्ही मराठ्यांच्या प्रश्नी मोर्चा काढला की कोरोना होतो आणि त्या नेत्यांनी इंधनप्रश्नी काढल्यावर कोरोना होत नाही का? काहीही झाले तरी रविवारी मोटरसायकल रॅली निघणार म्हणजे निघणारच. राज्य शासन दिशाभूल करत असून, स्वतःच्या जबाबदाऱ्या झटकत आहे. मराठा समाजाबद्दल मुख्यमंत्री जराही संवेदनशील राहिलेले नाहीत. एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नऊ सप्टेंबरपूर्वी नोकरीवर रुजू करून घ्यायला हवे होते. परंतु, तसे झाले नाही. आरक्षण गेले आता काय आणि कसे रुजू करणार आहात?. एकीकडे सारथीचा प्रश्न कायमच आहे.’

Also Read: ‘महाराष्ट्रात लवकरच सत्ताबदल; राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार’

Narendra Patil

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला (Annasaheb Patil Economic Backward Development Corporation) निधी मिळालेला नाही. महामंडळाची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. अलीकडे तर लाभार्थींना व्याज परतावा परत मिळेना झालाय, अशा तक्रारी आहेत. सोलापूरच्या आक्रोश मोर्चानंतर राज्य शासनाने मराठा समाजाचे प्रश्न व आरक्षण हे दोन्ही विषय गांभीर्याने घ्यावेत. लवकरात-लवकर त्याबाबत निर्णय व्हावेत, अन्यथा आंदोलने सुरूच राहतील. आम्ही पश्चिम महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात आंदोलनाचे नियोजन करतोय, त्यासंदर्भातील पुढचे पाऊल लवकरच जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.

Narendra Patil Criticism Of Nana Patole Ashok Chavan And Bhai Jagtap In Navi Mumbai bam92

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here