मेढा (सातारा) : प्रतिपंढरपूर करहर येथील श्री विठ्ठलाची आषाढी यात्रा (Ashadhi Wari 2021) यावर्षी कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, तसेच जिल्हाधिकारी (Collector Shekhar Singh) यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व नियोजित यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करहरमध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. (Pandharpur Wari 2021 Ashadi Ekadashi Festival At Karhar Cancelled bam92)

आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करहरमध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात.

मात्र, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही हे मंदिर भाविकांसाठी बंद राहणार असून, यात्रेनिमित्त १९ जुलै सायंकाळी ६ वाजल्यापासून ते २० जुलै रात्रीपर्यंत विठ्ठल मंदिर करहर व त्याभोवतालच्या १०० मीटरच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यात्रेदिवशी कुडाळ, करहर, आनेवाडी या महसूल मंडलातून मानाच्या पालख्या करहरमध्ये दाखल होतात. त्यामुळे करहर, कुडाळ महसूल मंडळातील सर्व गावे आणि आनेवाडी मंडलातील आलेवाडी या गावांतही संचारबंदीचे आदेश तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी काढले आहेत.

Pandharpur Wari 2021 Ashadi Ekadashi Festival At Karhar Cancelled bam92

Ashadhi Wari

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here