म्हसवड (सातारा) : कोरोनाची (Coronavirus) साथ आटोक्यात येत असतानाच डेंगीच्या साथीने डोके वर काढल्यामुळे म्हसवड परिसरातील नागरिक चिंतेत आहेत. गेली आठ दिवस परिसरात नियमित कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागत आहे. नित्य पावसामुळे रस्ते, नाले, शेतमळे दलदलीने व्यापून गेले आहेत. परिणामी, डासांची संख्या वाढत गेली. त्यातच डेंगी साथीच्याही डासांना पोषक वातावरण झाल्यामुळे डेंगीची लागण (Dengue Infection) झालेली रुग्णसंख्या वाढू लागली. डेंगीचे रुग्ण वाढू लागताच पालिकेने फोगर मशिनच्या (Fogger machine) साह्याने घरोघरी धुराची फवारणी करण्याची मोहीम सुरू केली आहे. (Citizens Infected With Dengue In Mhaswad Area bam92)

कोरोनाची साथ आटोक्यात येत असतानाच डेंगीच्या साथीने डोके वर काढल्यामुळे म्हसवड परिसरातील नागरिक चिंतेत आहेत.

पालिकेने तुंबलेल्या गटार, शहर व परिसरातील रस्त्यावर खड्यांची वाढलेली संख्या व त्यामध्ये पावसाचे पाणी साचून झालेली दलदल या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. नागरिकांनी घरात अनेक दिवसांपासून साठवणूक केलेल्या पाण्याच्या टाक्या रिकाम्या करून त्या वाळवून पुन्हा स्वच्छ पाण्याने भरून झाकून ठेवाव्याचे गरजेचे असून, निर्मनुष्य पडकी घरे, जुने वाडे, तुंबलेल्या गटारी, टाकून दिलेले टायर्स अशी डास उत्पत्तीची ठिकाणे आहेत. त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Also Read: Corona Impact : साताऱ्यात सोमवारपासून Lockdown शिथिल

Dengue

शहरात ठिकठिकाणी नवीन बंद गटारी बांधकामासाठी जुन्या गटारी खोदून तयार केलेल्या महिनोमहिने तशाच राहिलेल्या चारीत पावसाचे पाणी साचून राहात आहेत. संबंधित गटर्स बांधकाम ठेकेदारांना तातडीने गटर्स बांधकामे तातडीने करणार असतील, तरच जुन्या गटर्स खोदण्यास पालिकेने परवानगी द्यावी अन्यथा पावसाळा संपून गेल्यानंतर गटर्सची बांधकामे करावीत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Citizens Infected With Dengue In Mhaswad Area bam92

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here