प्रसिद्ध गायक राहुल वैद्यने 16 जुलै रोजी गर्लफ्रेंड दिशा परमारशी लग्न केलं. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. या फोटोंमधील दिशाच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. पाहुयात दिशाचे मेहंदी, हळद, लग्न आणि रिसेप्शनमधील रॉयल लूक्स…

राहुल वैद्यने 16 जुलै रोजी दिशा परमारशी लग्नगाठ बांधली. या दोघांवर सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मेहंदी, हळद, लग्न आणि रिसेप्शन या सोहळ्यामधील दिशाच्या लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.
मेहंदी सोहळ्यासाठी दिशाने गुलाबी रंगाचा कुर्ता आणि पलाझो असा लूक केला होता. त्यावर गळ्यात आणि कानात सोनेरी रंगाचे दागिने परिधान केले होते.
हळदीच्या कार्यक्रमात दिशाने पिवळ्या रंगाचा वनपीस घातला होता.
दिशाने लग्न सोहळ्यासाठी रॉयल लूक केला होता. लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती. मेक अप आर्टिस्ट श्रद्धा लुथ्राने दिशाचा मेकअप केला होता. तर तिचा लेहंगा अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केला होता.
रिसेप्शन आणि संगीत सोहळ्यासाठी दिशाने सिल्व्हर सिक्विन साडी नेसली होती. तसेच सिल्व्हर नेक पीस आणि कानातले देखील घातले होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here