बालेवाडी : बालेवाडी येथील पाटील वस्ती येथे( ता.16, वार शुक्र.) रोजी रात्री रावसाहेब चिंनप्पा काकडे( वय 65) हे पाय घसरून विहिरीत पडले. आजूबाजूला वस्ती नसल्याने हे कोणाच्या लक्षात आले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घटनेची माहिती मिळताच पीएमआरडी अग्निशामक केंद्र, मारुंजी या अग्निशामक दलाच्या जवानांनी या वृद्ध इसमाची सुटका केली.
बालेवाडी तेथे पाटील वस्तीवर कृष्णा बालवडकर यांच्या विहिरीत साहेबराव चिंनप्पा काकडे (रा. फुले नगर, पिंपरी) हे रात्रीच्या वेळी पाय घसरून पडले. बालवडकर सकाळी विहिरीजवळ पाणी पाहण्यासाठी गेले असता, एक व्यक्ती पाण्यातच दोरीला धरून उभी असलेली त्यांना दिसली. बालवडकर यांनी लगेच पोलीस चौकीशी संपर्क साधून घटनेबद्दल माहिती दिली. त्यानंतर पी.एम.आर.डी. अग्निशामक दलास बोलविण्यात आले.
Also Read: पुणे विभागातील ९९.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

साधारण साडे नऊच्या दरम्यान साहेबराव काकडे यांना अग्निशमन जवानांनी सुखरूप बाहेर काढून पोलिसांच्या सुपूर्त केले.
अग्निशमन दलाचे फायरमन प्रकाश मदने, प्रशांत चव्हाण, वैभव कोरडे आणि महेंद्र देशमुख या जवानांनी मोठे हिमतीने विहिरीत पडलेल्या वृद्ध व्यक्तीची सुटका केल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस नाईक रोहित कट्टे व गणेश चौधरी ही हजर होते . रात्रभर पाण्यात राहिल्यामुळे काकडे अतिशय घाबरलेले होते.तसेच त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क झाला असून काकडे यांना नातेवाइकांच्या सुपूर्त करणार असल्याचे चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगाव यांनी सांगितले.
Also Read: IISER Pune Fire : संशोधकांच्या सजगतेमुळे टळला मोठा अनर्थ
Esakal