छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेमधील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. पाहूयात या मालिकेतील काही कलाकारांचे जुने फोटो

तारक मेहता का उल्टा चाष्मा या मालिकेत जेठालाल ही भूमिका साकारणारे कलाकार दिलीप जोशी यांनी सोशल मीडियावर त्यांचा जुना फोटो शेअर केला होता. त्याला त्यांनी कॅप्शन दिले, ‘कोणी तरी मला सांगितलं की इन्स्टाग्रामवर throwback thursday हा ट्रेंड आहे. त्यामुळे मी माझा 1983 मधील फोटो शेअर केला. हा माझा पृथ्वी थेटरच्या ग्रीन रूम मधील फोटो आहे. ‘
मिस्टर भिडे ही भूमिका साकारणारे कलाकार मंदार चांदवडकर यांचा ‘हमारे जमाने मै’ हा डायलॉग प्रसिद्ध आहे. हा डायलॉग कॅप्शनमध्ये लिहून त्यांनी त्यांचा हा जुना फोटो शेअर केला आहे.
तारक मेहता मधील चंपक चाचा ही भूमिका अमित भट्ट साकारतात त्यांनी देखील त्यांचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
पोपटलाल ही भूमिका साकारणारा अभिनेता श्याम पाठकने त्याचा जुना फोटो शेअर करून कॅप्शन लिहीले, ‘हा माझा तरूणपणाचा फोटो आहे, पण मी अजूनही तरूणच आहे’
तारक मेहता ही भूमिका साकारणारे शैलेश लोढा या मालिकेत २००८ पासून काम करत आहेत. त्यांनी त्यांचा throwback फोटो शेअर करून कॅप्शन लिहीले, ‘हा फोटोपाहून मी स्वत;ला ओळखू शकलो नाही.’

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here