सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांची पत्नी नताशा पूनावाला यांच्या 80 लाखांची बॅगेचे फोटो सोशल मिडियावर नुकतेच व्हायरल झाले होते. आता आम्ही तुम्हाला जगभरातील सर्वात महागड्या बॅगांची माहिती देणार आहोत. जगातील टॉप फाईव्ह सर्वात महागड्या बॅग आणि त्यांच्या किंमतीची माहिती आम्ही सांगणार आहोत.

नोव्हेंबर २०२० मध्ये जगातील सर्वात महागड्या बॅगचे लॉन्च करण्यात आले. डब केलेली पर्व मिआ तब्बल 6 मिलियन युरो ( 7.18मिलियन डॉलर्स किंवा 52 करोड कोटी रुपये) किंमत आहे. ही बॅगचा अर्धा भाग मगरीच्या त्वचेपासून तयार केला आहे तर अर्धा भाग 10 पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या फुलपाखरांपासून तयार केला आहे.

गेल्या वर्षाच्या ऑक्टोबरपर्यंत मौवाड 1001 नाईट डायमंड पर्स जगातील सर्वात महागड्या हँडबॅग म्हणून ओळखली जात होती. 2011च्या गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही तशी नोंद करण्यात आली होती. मौवाड १००१ नाईट डायमंड पर्सची किंमत 3.8 मिलियन डॉलर्स इतकी आहे. हार्ट शेप असलेल्या या पर्सवर 18 कॅरट गोल्ड आणि 4517 हिऱे लावण्यात आले आहेत

3. हर्म्सची केली रोड गोल्ड बॅग( Hermès Kelly Rose Gold Bag) 2 दशलक्ष डॉलर्स
जगातील सर्वात महागड्या बॅगांच्या यादीत हर्म्सची केली रोड गोल्ड बॅग ही तिसऱ्या स्थानावर आहे. ही बॅग सॉलिड(Solid) रोज पासून बनवली असून 1160 हिरे लावण्यात आले आहे. ही बॅग ज्वेलरी आणि शूज् डिझाईनर पियरे हार्डी(Pierre Hardy) यानी बनविली असून 2 मिलीयन डॉलर्स किमंतीची आहे.

हर्म्स हा असा ब्रॅंड आहे ज्यांची प्रत्येक हँडबॅग आपल्या मालकीची असावी असे सर्वांना वाटते. गिन्झा टानाका बिर्किन बॅगेव 2000 हिरे लावण्यात आले आहेत. यात डायमंड-एन्क्र्स्टेड स्ट्रॅप देखील आहे जो पर्सपासून वेगळा करता येतो आणि ब्रेसलेट किंवा नेकलेस म्हणून वापरता येतो.

5. हर्म्स चेन’एड अँकर बॅग( Hermés Chaine’d Ancre Bag)- 1.4 मिलियन डॉलर्स
ब्रँडच्या ‘हौटे बिजोटेरी’ कलेक्शनला टक्कर देण्यासाठी डिझाईनर पियरे हार्डी यांनी तब्बल 2 वर्ष मेहनत घेऊन 2012मध्ये ही बॅग लॉन्च केली. या बॅगवर 1160 हिरे लावले असून चेनसोबत जोडले आहे. या बॅगचे फक्त तीनच पीस तयार करण्यात आले होते.
Esakal