वॉशिंग्टन – दारू (Wine) पीने से लिव्हर (Lever) खराब होता है, हा यापूर्वी सप्रमाण सिद्ध झालेला मुद्दा संशोधकांनी पुन्हा अधोरेखित केला आहे. गेल्यावर्षी भारतासह जगात मद्यामुळे कॅन्सर (Cancer) झालेल्या रुग्णांची (Patient) संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. (Be Careful Before You Cheer)
फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय कॅन्सर संशोधन संस्थेने अभ्यासातून यासह काही निष्कर्ष काढले आहेत. तेथील संशोधिका हॅरीएट रुमगाय यांनी सांगितले की, युरोपमध्ये प्रतिव्यक्ती मद्यप्राशनाचे प्रमाण कमी झाले असले तरी चीन, भारतासारख्या आशियायी देशांत तसेच सहारा आफ्रिकेत ते वाढले आहे. काही देशांत कोरोनामुळे यात वाढ झाल्याचे आढळून आले.

युरोपचा आदर्श जगाने घ्यावा
कर आणि किंमतनिश्चितीच्या धोरणांमुळे युरोपमध्ये मद्यसेवनाचे प्रमाण कमी झाले आहे. यापासून आदर्श घेत जगाच्या इतर भागांत अबकारी करात वाढ आणि प्रति युनिट किमान किंमत आकारणे असे उपाय अवलंबिता येतील असे संशोधकांनी म्हटले आहे.
उच्चांक-नीचांक टक्केवारी
देशानुसार
-
मंगोलिया – १०
-
कुवेत – ०
खंडानुसार
पूर्व आशिया, मध्य-पूर्व युरोप – ६ उत्तर आफ्रिका, पश्चिम आशिया – १ टक्क्यांपेक्षा कमी
मद्यप्राशनाचे प्रमाण
-
माफक – दिवसाला २ पेग
-
धोकादायक – दिवसाला २ ते ६ पेग
-
अति – दिवसात सहाहून जास्त
सर्वाधिक धोका
१) अन्ननलिकेचा कॅन्सर
२) यकृत
३) स्तन-छाती
संशोधकांचे उपाय
-
मद्य कॅन्सरला कारणीभूत ठरते अशी जनजागृती आणखी वाढावी म्हणून प्रयत्न हवेत
-
या समस्येची गंभीर तीव्रता असलेल्या ठिकाणी मद्यप्राशनाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून सरकारकडून आणखी निर्बंध हवेत
-
सार्वजनिक आरोग्य धोरणाचा या अनुषंगाने अवलंब
-
मद्याच्या उपलब्धतेचे प्रमाण कमी करणे-
-
आरोग्यास धोका असल्याचा इशारा देणारे लेबल
-
मार्केटिंगवर (जाहिराती) बंदी
थोडीच घेतो म्हणणाऱ्यांनो, वाचा
मद्यप्राशनाचे प्रमाण माफक असले तरी ते धोकादायक ठरल्याचे या अभ्यासात दिसून आले. अशा रुग्णांची संख्या एक लाख ३ हजार १०० इतकी होती, ज्याची टक्केवारी १४ आहे.
मद्यप्राशनाचे दुष्परिणाम
-
डीएनएवर दुष्परिणाम
-
शरीरात घातक रसायनांचे जास्त प्रमाण
-
संप्रेरकांच्या निर्मितीवर परिणाम
Esakal