India coronavirus update नवी दिल्ली- भारतात गेल्या 24 तासांत 41 हजार 157 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 42 हजार 004 लोकांनी विषाणूवर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. देशातील सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. सध्या देशात कोरोनाचे 4.22 लाख सक्रिय रुग्ण आहेत. केरळमध्ये सर्वाधिक 16 हजार 148 रुग्ण आढळले आहेत. विषाणूने गेल्या 24 तासांत 518 लोकांचा बळी घेतला आहे. केरळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. (india coronavirus update today maharashtra kerala more cases of covid19 health ministry)

देशात आतापर्यंत 3 कोटी 02 लाख 69 हजार 796 लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलंय. आतापर्यंत 4 लाख 13 हजार 609 लोकांचा कोरोना विषाणूमुळे जीव गेला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 40 कोटी 49 लाख 31 हजार 715 लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. कोरोना विषाणूला हरवण्यासाठी देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती.

corona update

देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.31 टक्के झाला आहे. तर एकूण सक्रिय रुग्ण 1.36 टक्के आहेत. आढवड्याचा पॉझिटिव्ही रेट 5 टक्क्यांची खाली नोंदला जात आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 44 कोटी 39 लाख लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 19 लाख 36 हजार 709 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

corona update

महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी

राज्यातील कोरोना संसर्गाचा वेग कमी होताना दिसत आहे. शनिवारी दिवसभरात राज्यात 8 हजार 172 नवे रुग्ण आढळले. तर 8 हजार 950 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 124 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. एकूण 56 लाख 74 हजार 594 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात एकूण 1 लाख 429 सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.28% इतके झाले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here