बॉलिवूड बरोबरच हॉलिवूडमध्ये देखील वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राचा आज 39 वा वाढदिवस आहे. जाणून घेऊयात तिच्याबद्दल काही खास गोष्टी…

बॉलिवूडमध्ये देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राचा आज 39 वा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रियांकाचा जन्म 18 जुलै 1982 साली जमशेदपुर येथे झाला.
2000 मध्ये प्रियांकाने ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकला.
2003 मध्ये ‘द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाय’ चित्रपटामधून प्रियांकाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. प्रियांकाने बॉलिवूडमधील अनेक सुपर हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
2018 साली प्रियांकाने अभिनेता आणि गायक निक जोनससोबत लग्न केले.
प्रियांका बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये काम करते. एका रिपोर्टनुसार प्रियांकाचे नेट वर्थ 225 करोड रूपये आहे.
प्रियांका एका महिन्यात दिड करोड रूपये कमवते. तिचे मुंबईमधील जुहू येथे आलिशान घर आहे. तसेच तिचे अमेरिकेत देखील एक घर आहे.
Mercedes Benz S class, Porsche, Mercedes Benz E class आणि BMW या लक्झरी गाड्या प्रियांकाकडे आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here