विरार: काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वसई तालुक्यातील पूर्वेला असलेल्या काही गावांचा संपर्क तुटला. पावसामुळे पूल व महामार्ग पाण्याखाली गेले. त्यामुळे गावांची संपर्क तुटल्याच्या घटना घडल्या. त्याच बरोबर या ठिकाणी जाण्यासाठी असलेला रस्ताही खचल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला. तसेच, दुसऱ्या बाजूला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर, ससूनपाडा, मालीपाडा या भागात पाणी भरल्याने सकाळपासून येथील वाहतूकही पूर्णपणे बंद होती. सकाळी ९ वाजल्यानंतर धीम्या गतीने ही वाहतूक सुरु झाली. (Vasai Virar Rain Updates Mumbai Ahmedabad Highway Pandhartara Bridge under water due to heavy rainfall)

वसई पूर्वेतील उसगाव मार्गे पलीकडील नवसई, भाताणे, आडणे, थळ्याचा पाडा अशा प्रमुख गावांसह 25 ते 30 छोटे मोठे पाडे व वस्त्यांकडे जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग म्हणून पांढरतारा या पुलाचा वापर केला जातो. हा मार्ग पलीकडील बाजूने दर वर्षी पावसाळ्यातील पुराच्या पाण्याने खचून जात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मात्र तरीही वज्रेश्वरी मार्गावरून पलीकडे जाताना अत्यंत जवळचा मार्ग म्हणून रहिवाशी याच मार्गाचा जास्त वापर करतात .या मार्गावर पांढरतारा हा कमी उंचीचा पूल असून पाऊस सतत कोसळू लागला की काही तासातच हा पूल पाण्याखाली जातो. असा मागील 20ते 25 वर्षांचा इतिहास पाहता दरसाल ऑगस्टपर्यंत सहा ते सात वेळा व एक वेळेला दोन दोन तीन तीन दिवस पावसाच्या बरसण्याच्या वेळेनुसार पाण्याखाली असतो. यंदा तो पूल पाण्याखाली आतापर्यंत गेला नव्हता. मात्र शनिवारी रात्री कोसळणाऱ्या पावसामुळे अखेर पांढरतारा यंदा पहिल्यांदा पाण्याखाली गेला. त्यामुळे पलीकडील रहिवासांशी महामार्गापासून भालीवलीमार्गे जाणारा 12 ते 13 किलोमीटर जास्त अंतराच्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.

एका बाजूला ग्रामीण भागातील हि स्थिती असताना दुसर्या बाजूला मुंबई अहमदाबाद माहा मर्गावरही गेल्या तीन वर्षा पासून जोराचा पाऊस झाला कि पाणी भरण्याचे प्रमाण वाढले आहे काल मध्यरात्री पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसा मुळे घोडबंदर,ससुपाडा आणि मी,मालजीपाडा या ठिकाणी डोंगरातून येणाऱ्या पाण्या मुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरही पाणी साचल्याने सकाळी येथील वाहतूक ३ वाजल्या पासून पूर्ण पण बंद पडली होती. याचा फटका आज वसई सह पालघर डहाणू आणि पुढील भागात जाणार्या वृत्रतपत्रांच्या गाडयांनाही बसला असून आज या भागात वृत्तपत्रेही आलेली नाहीत. त्यातच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे संथगतीने काम सुरु असल्याने त्याचा फटका वाहतूक बंद होण्यास लागला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here