मुंबई: शहरात पुढील पाच दिवस पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दरम्यान मुंबईत काही भागात मुसळधार तर काही भागात अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Mumbai gets Orange Alert for next 5 days Warning for Heavy Rainfall for Konkan Marathwada Goa)
Also Read: मुंबई-अहमदाबाद महामार्ग, पांढरतारा पूल गेला पाण्याखाली
कोकण आणि गोव्यात आज आणि उद्या मुसळधार आणि अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर त्यापुढील तीन दिवसदेखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या शिवाय मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यामध्येदेखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात रविवार आणि सोमवारी अति मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला असून मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी मात्र पावसाची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या मुसळधार पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. महाराष्ट्राकडून कर्नाटककडे नैऋत्य वारे वाहत आहेत. त्यामुळे वातावरणात बदल झाला असून पुढील काही दिवस पाऊस कोसळणार असल्याचे कुलाबा बेधशाळेचे डॉ. जयंता सरकार यांनी सांगितले आहे.

Also Read: पालघरमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; जाणून घ्या निर्माण झालेली स्थिती
शहर आणि उपनगरात रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला. पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं. मुंबईत 192.17 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शनिवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर रात्रीही पावसाचा जोर कायम राहिला. शहर,पाश्चिम तसेच पूर्व उपनगरात दमदार पाऊस कोसळला. पूर्व उपनगराला पावसाने सर्वाधिक झोडपून काढलं.
(संपादन- विराज भागवत)
Esakal