बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करत असतो. ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘रामलीला’, ‘गली बॉय’, ‘सिम्बा’ या सुपर हिट चित्रपटांमधून रणवीर प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता रणवीरच्या अप कमिंग चित्रपटांबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. पाहूयात चर्चेत असणारे रणवीरचे अप कमिंग चित्रपट…

रणीरचा ’83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर क्रिकेटर कपिल देव यांच्या भूमिकेत तर दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे कथानक हे २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता, या ऐतिहासिक क्षणावर आधारित आहे.
रणवीरचा अपकमिंग चित्रपट ‘सूर्यवंशी’ च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. ‘सिंघम’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘सिंबा’ यानंतर पोलीसांवर आधारित चित्रपटांच्या मालिकेतला ‘सूर्यवंशी’ हा रोहितचा चौथा चित्रपट आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता करण जौहरच्या ‘तख्त’ या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. हा चित्रपट ऐतिहासिक कथानकावर आधारित आहे. रणवीर या चित्रपटात महत्वपुर्ण भूमिका साकारणार आहे.
2006 मध्ये प्रदर्शित झालेला तमिळ सुपर हिट चित्रपट ‘अनियन’ चा हिंदीमध्ये डब केलेला चित्रपट म्हणजेच ‘अपरिचित’चा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील प्रमुख भूमिका रणवीर साकारणार आहे
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यात धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी हे सुद्धा दिसून येणार आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here