औरंगाबाद : शेकटा ते शेंद्रा रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावीत. अन्यथा टोलनाका बंद पाडू असा इशारा दिल्यानंतर रविवारी (ता.१८) रस्त्यावरील खड्डे बूजवित. या टोल कंपनीने रस्त्याची डागडुजी केली आहे. याबाबत भाजपचे (BJP) सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष आशिष जैस्वाल यांनी माहिती दिली. जालना रस्त्यावरील शेकटा ते शेंद्रा (Shendra) दरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले होते. एवढेच नव्हे तर एका भाजप कार्यकर्त्याने थेट पोते आणत एक खड्डा बूजविला होता. त्यानंतर काही पदाधिकारी थेट आमदार तथा माजी विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे (MLA Haribhau Bagade) यांच्याकडे जात त्यांनी या विषयी तक्रार दिली होती. त्यानुसार श्री.बागडे यांनी संबंधित कंपनीला फोन करून खड्डे बूजा अन्यथा टोलनाका बंद पाडू असा इशारा दिला. (after haribhau bagade warning road repaired in aurangabad tahsil glp 88)
Also Read: दोघांचे प्रेम पाहून पोलिस भारावले! चार किलोमीटर पळवल्यानंतर…

त्यानंतर भाजप तालुकाध्यक्ष रामबाबा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे सजन पाटील यांनी शनिवारी (ता.१७) संबंधित टोलनाका चालकास या विषयी निवेदन दिले होते. त्याची दखल घेत हे काम सुरु झाले आहे. करमाड गावासह शेकटा ते शेंद्रा दरम्यान सर्व खड्डे बुजविण्यात आले आहेत. हे खड्डे बुजविल्यामुळे नागरिकांनी आमदार हरिभाऊ बागडे, तालुकाध्यक्ष रामबाबा शेळके, बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे यांचे आभार मानले.
Esakal