नाशिक : युगानुयुगे कटेवर हात ठेवून पतितपावन विठ्ठल भक्तांसाठी उभा आहे. त्याच्या दर्शनासाठी निवृत्तिनाथांच्या पालखीचे आज पहाटे (ता.१९) प्रस्थान झाले. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास सजविलेल्या बसद्वारा निवृत्तिनाथ महाराज पंढरपूरला निघाले. सुमारे आठ ते दहा तासांचा प्रवास करून वाखारी ते पंढरपूर पायी जाण्यासाठी परवानगी शासनाने दिली आहे
आज (ता.१९) पहाटे मुसळधार पावसात निवृत्तिनाथ महाराज प्रतिमा व पादुका भजन व किर्तन करीत दोन शिवशाही बसद्वारा पंढरपुरला प्रस्थान झाल्या. परंपरेच्या व मानाच्या दिंड्यांचे प्रतिनिधी, मंदिर प्रशासक सदस्य, विनेकरी, सेवेकरी अश्या चाळीस सदस्यांना या बसमधून पंढरीनाथ दर्शन व वारीची संधी मिळाली. तत्पुर्वी पहाटे पुजक ह.भ.प.जयंत महाराज गोसावी व बंधु यांनी निवृत्तिनाथ समाधीची नेहमीची पुजा केली. त्यानंतर प्रातिनिधिक प्रस्थान केलेली प्रांगणातील पालखीची पुजा संपन्न झाली. पालखीसह मंदिर फुलांनी व माशांनी सुशोभित करण्यात आले होते. साडेपाच ला निवृत्तिनाथ महाराज यांचा जयघोष करीत चांदीची प्रतिमा व पादुका कुशावर्त तीरावर स्नानासाठी आणण्यात आल्या. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी स्वागत करुन पादुका व प्रतिमेची अभिषेक पुजा केली. या वेळी प्रशासक धर्मादाय सहा. आयुक्त कृष्णा सोनवणे, अँड. भाऊसाहेब गंभीरे, मुख्याधिकारी संजय जाधव, पोलिस निरीक्षक संदिप रणदिवे, प्रांत तेजस चव्हाणतहसिलदार दिपक गिरासे, पुजक गोसावी परिवार या सह पारंपरिक दिंडी सोहळ्याचे वारकरी उपस्थित होते.कुशावर्त स्नान सत्यनारायण मंदिराजवळुन ह्या प्रतिमा व पादुका त्रंबकेश्वर मंदिर दरवाजा समोर आणण्यात आल्या देवस्थान तर्फे मानकरी लोकांना श्रीफळ देण्यात आले. डाॅ. आंबेडकर चौकात दोन सजविलेल्या शिवशाही बसमध्ये पादुका ठेवण्यात आल्या या वेळी महिला फुगडी खेळत अभंग म्हणत होत्या.आमदार हिरामण केसकर, संपत सकाळी, जिल्हा ग्रामीण पोलिस प्रमुख पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले यांच्यासह महिला व पुरुष पोलिस लवाजमा बंदोबस्तासाठी हजर होता.