पंतप्रधान मोदींनी संसदेत प्रवेश केला, त्यावेळी पाऊस पडत होता.संसद परिसरात प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे भाजप नेते प्रल्हाद जोशी यांनी स्वागत केले. पावसाच्या आगमनाने अधिवेशनाची सुरुवात झाली. अधिवेशनाआधी पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळे त्यांनी हातात छत्री धरली होती. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि डॉ. जितेंद्र सिंह उपस्थित होते. मोदी म्हणाले की, ‘लस दंडावर घेतली जाते. त्यामुळेच कोरोना विरोधातील लढ्यात लस घेतलेला बाहुबली बनतो. 40 कोटींपेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे. कोरोनाच्या लढ्यात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कोरोनाविरोधात बाहुबली होऊन लढा देऊयात.’नितीन गडकरी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत जातानापावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेला संबोधित केलं.विरोधकांनी संसदेबाहेर आंदोलन केले. केंद्र सरकारने नव्याने लागू केलेले कृषी कायदे रद्द करावेत यासाठी हे आंदोलन होते.