पंढरपूर (सोलापूर) : आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari) दरवर्षी पंढरपुरात (Pandharpur) लाखो वारकऱ्यांचा व भाविकांचा मेळा भरलेला असतो. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर शहर व परिसर गजबजून गेलेला असतो. दरवर्षी आषाढी दशमीच्या दिवशी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागेत स्नान करण्यासाठी परवानगी नसल्याने सोमवारी (ता. 19) वारकऱ्यांअभावी वाळवंट सुनेसुने जाणवत होते. (On the day of Dashmi, peace has prevailed in Pandharpur city without Warkari and devotees-ssd73)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागेत स्नान करण्यासाठी परवानगी नसल्याने सोमवारी वारकऱ्यांअभावी वाळवंट सुनेसुने जाणवत होते.
आषाढी दशमीला वारकऱ्यांविना ओस पडलेल्या चंद्रभागा वाळवंटाचे छायाचित्र.
आषाढी यात्रेला आलेल्या दिंडीतील वारकऱ्यांच्या राहुट्या व तंबूमुळे 65 एकर परिसर गजबजलेला असतो. यंदा मात्र 65 एकर परिसरात शांतता दिसून येत आहे.
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गोपाळपूर रस्ता पत्रा शेडमधील दर्शन बारीतील रांगेत हजारो वारकरी उभी असतात. यावर्षी मात्र दर्शन बारी पूर्णपणे ओस पडली आहे.
आषाढी दशमीच्या दिवशी श्री विठ्ठल मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो. आज या परिसरात शुकशुकाट जाणवत होता.
विठू नामाच्या जयघोषात प्रदक्षिणा मार्गावरून दिंड्या प्रदक्षिणा घालत असतात. यावर्षी संचारबंदी असल्याने सोमवारी दशमीच्या दिवशी प्रदक्षिणा मार्गावर पोलिस प्रशासनाने बॅरिकेडिंग केलेले दिसून आले. (सर्व छायाचित्रे : राजकुमार घाडगे)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here