-हॅरी पॉटर- डॅनियल रॅडक्लिफ (Daniel Radcliffe) :
हॅरी पॉटर या सिरीजमध्ये मुख्य पात्र हॅरीची भूमिका साकारणारा डॅनियल रॅडक्लिफ हा आजही अॅक्टींग करत आहे. नॉऊ यू सी मी भाग 2 आणि किल युअर डार्लिंग या चित्रपटातही काम केले आहे.
हर्मिओन ग्रेंजर – एम्मा वॉटसन( Emma Watson) :
हॅरी पॉटर या सिरीजमध्ये हर्मिओनची भूमिका साकरणारी एम्मा वॅटसन देखील अद्यापही अक्टींग करते असून तिने द पर्कस् ऑफ बिअिंग वॉलफ्लॉवर, ब्युटी आणि द बिस्ट आणि लिटील वूमन या चित्रपटांमध्ये झळकली होती.

फ्रेड आणि जॉर्ज – जेम्स आणि ऑलिव्हर फेल्प्स (James and Oliver Phelps) : हॅरी पॉटर या सिरीजमध्ये रॉनच्या मोठे जुळे भाऊ फ्रेड आणि जॉर्ज यांची भूमिका जेम्स आणि ऑलिव्हर फेल्प्स यांनी साकारली आहे. इतर कलाकारांसारखे अॅक्टीव्ह नसले तरी तरी त्यांनी स्वत:चे नॉर्मल नॉट नॉर्मल टु़डे हे पॉडकॉस्ट सुरु केले आहे.

जिनी वेस्ले -बोनी राइट ( Bonnie Wright)
रॉनची लहान बहिणीची भूमिका साकारणारी जिनी हीची भूमिका बोनी राइट हिने साकरली होती. नुकतीच तिने एका मुलाखतीमध्ये सांगितली की जिनीचे ची मला अजूनही आठवते पण पण पुन्हा पुन्हा सिरिज पाहण्याची इच्छा होत नाही
सेड्रिक डिग्गोरी – रॉबर्ट पॅटिन्सन (Robert Pattinson)
हॅरी पॉटर आणि गॉब्लेट ऑफ फायरमध्ये दिसलेला सेड्रिक डिग्गोरी म्हणजेच रॉबर्ट पॅटिन्सन हा ट्वाईलाईट सागा- द डेव्हिल ऑल द टाईम आणि नवीन बॅटमॅनमध्ये झळकला होता.
ड्रॅको मालफॉय- टॉम फेल्टन (Tom Felton)
ड्रॅको मालफॉय हे हॅरी पॉटर सिरीजमधील पात्र टॉम फेल्टन याने साकरले असून टेलिव्हिजन आणि फिल्ममध्ये तो खूप अॅक्टिव्ह आहे. राईज ऑफ प्लॅनेट ऑफ एप्स, ऑफेलिअआ या चित्रपटांमध्ये आणि ऑरिजन या टेलिव्हिजन शोमध्येही झळकला होता.

पद्मा पाटील : अफशन आझाद (Afshan Azad)
हॅरी पॉटर सिरिजमध्ये पद्मा पाटील या मुलीची भूमिका साकारणारी अफशन आझाद सध्या खऱ्या आयूष्यात प्रेग्नंट आहे. नुकतेच तिने तिच्या इन्स्टांग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले.

नेव्हिल लाँगबॉटम- मॅथ्यू लुईस(Matthew Lewis)
हॅरी पॉटर सिरिजमध्ये नेव्हिल लाँगबॉटम हे पात्र साकरल्यानंतर मॅथ्यू लुईस याने द सिंडिकेट, द राईज आणि ब्लू स्टोन 42 या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका देखील केल्या आहेत

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here