प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत अशी काही वाडे, राजवाडे आणि किल्ले भारतात बांधली गेले, जी केवळ भारतातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहेत. काही किल्ले जगभरात सर्वोउत्तम आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध आहेत, तर काही किल्ल्याला सर्वात मोठे म्हणून ओळखले जाते. भारताच्या महान राजांनी युद्ध आणि स्वत:च्या संरक्षणासाठी एकामागून एक भक्कम आणि भव्य किल्ले बांधले होते. आज आपण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या काही भव्य किल्ल्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

राजस्थान हे भारतातील असे एक राज्य आहे, जिथे प्रत्येक शहरात एक मोठा किल्ला आहे. राजस्थानच्या जोधपूर शहरातही मेहरानगड किल्ला आहे. 400 फूटांपेक्षा जास्त उंच असलेल्या टेकडीवर बांधलेला हा किल्ला भारतातील सर्वात मोठा किल्ला मानला जातो. हा बाराशे एकर क्षेत्रावर पसरलेला आहे.
भेट देण्याची वेळ- सकाळी 9 ते संध्याकाळी 5.
तिकिट – भारतीय पर्यटकांसाठी 60 रुपये. विदेशी पर्यटकांसाठी सुमारे 400 रुपये.

भारताची राजधानी दिल्लीत असलेला लाल किल्ला सुमारे दोनशे एकर जागेवर पसरलेला आहे. हा किल्ला भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांमध्ये सामील होतो. जो जगप्रसिद्ध आणि एक प्रतीकात्मक स्मारक आहे. 17 व्या शतकात हा किल्ला लाल वाळूच्या दगडांनी बांधला गेला आहे. या विशाल किल्ल्याच्या आत दिवाण-ए-आम, दिवाण-ए-खास, आणि मोती मशिद अशी अनेक आकर्षक राजवाडे आहेत. हा विशाल किल्ला पर्शियन आणि भारतीय वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना आहे.
भेट देण्याच्या वेळ – सकाळी 9:30 ते संध्याकाळी 4:30.
तिकिट दर- सुमारे भारतीय पर्यटकांसा सुमारे 35 रुपये आणि परदेशी पर्यटकांसाठी सुमारे 500 रुपये आहे.

दक्षिण भारतात अनेक मोठे किल्ले आहेत, परंतु सर्वात मोठा किल्ला हैदराबाद मधील गोलकोंडा किल्ला मानला जातो. १६०० च्या आसपास बांधलेला हा किल्ला सुमारे चारशे फूट उंच डोंगरावर आहे. या किल्ल्यात 8 दरवाजे आणि तीन विशाल तटबंदी आहेत. असे म्हणतात की एकदा या किल्ल्यात कोहिनूर हिरासुद्धा साठला होता.
भेट देण्याची वेळ- सकाळी 9 ते संध्याकाळी 5.
तिकिट – भारतीय पर्यटकांसाठी 15 रुपये. विदेशी पर्यटकांसाठी सुमारे 200 रुपये.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर किल्ला हा देशातील सर्वात विशाल किल्ल्यांपैकी एक आहे. आठव्या शतकात बांधलेल्या या किल्ल्याची बाह्य भिंत सुमारे 2 मैलांची असून रुंदी 200 मीटर आहे. हा किल्ला सुमारे सातशे एकरांपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेला आहे.
भेट देण्याची वेळ- सकाळी 9: 30 ते संध्याकाळी 5: 30 .
तिकिट – भारतीय पर्यटकांसाठी 75 रुपये. विदेशी पर्यटकांसाठी सुमारे 250 रुपये.
Esakal