सिंधुदुर्ग : ‘गाव करील ते राव न करील’ अशी एक म्हण प्रचलित आहे आणि या म्हणीचा प्रत्यय आलाय तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील सर्जेकोट गावात. हे पूर्ण गाव पर्यटन व्यवसायासाठी एकत्र आले आहे. खरे तर एखादा पूर्ण गाव रोजगारासाठी एकत्र येणे कठीणच असते. मात्र, ही किमया साधली आहे सर्जेकोटने. यातून एक भक्कम व्यावसायिक नेटवर्क उभे झाले असून, हे गाव पर्यटनातून आर्थिकदृष्ट्या संपन्नतेकडे वेगाने वाटचा करीत आहे.
स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग आणि पॅरासिलिंग हे सर्व प्रकार व्यावसायिक तत्त्वावर एकत्र येऊन या गावाने सुरू केले आहेत. सर्जेकोट गाव पूर्वी मच्छीमारी गाव म्हणून प्रसिद्ध होता; मात्र मत्स्य दुष्काळाचे संकट उभे राहिल्यानंतर रोजगाराचा प्रश्न तरुणांसमोर उभा राहिला. त्यावर गावातील तरुणांनी एकत्र येऊन मात केली. त्यांनी पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायातून आज सक्रिय असलेला प्रत्येक तरुण चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न घेतोय आणि या व्यवसायातून त्यांची वाटचाल आता स्वयंपूर्णतेकडे झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील मच्छीमारी हाच प्रमुख व्यवसाय; मात्र गेल्या काही वर्षांत समुद्रातील मासे मिळण्याचे प्रमाण घटत गेले. मासे मिळेनासे झाल्याने अनेक तरुण कर्जबाजारी झाले. कर्जाच्या विळख्यात सापडलेले हे मच्छीमार कुठेतरी पाच-दहा हजार रुपयांची नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत होते; मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन बहरू लागले आणि बरेच तरुण पर्यटन व्यवसायात उतरले. अनेकांनी स्वतःच्या घरातच दोन-चार खोल्या उपलब्ध करून पर्यटकांना राहण्याची व्यवस्था केली.
हेही वाचा – रत्नागिरीत मोबाईल विक्रेत्यावर अचानक झाला गोळीबार अन….
सर्जेकोट गावाने एक आदर्श निर्माण केला
त्यातूनही चांगला रोजगार मिळू लागल्याने मच्छीमारीपेक्षा पर्यटन बरं असाच इथल्या तरुणांचा समज झाला; मात्र अलीकडे पर्यटन व्यवसाय वाढत असताना या व्यवसायात अनेक तरुण उतरल्याने या व्यवसायातही स्पर्धा वाढली. यातून दिशा चुकलेले बरेच जण कर्जाच्या विळख्यात सापडले.या सर्वांवर मात करत सर्जेकोट गावाने एक आदर्श निर्माण केला आहे. प्रत्येकाने स्वतंत्र व्यवसाय केला तर त्यात स्पर्धा वाढते आणि त्यातून मग दरामध्ये घसरण होते, याचा विचार करून संपूर्ण गावाने एकत्र येत सहकारी तत्त्वावर पर्यटन व्यवसाय सुरू केला.त्यांनी ‘डाइव्ह सर्जेकोट’ या नावाने स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, वॉटर स्पोर्ट, पॅरासिलिंग असे व्यवसाय सुरू केले. यात तरुणांनी सुमारे दीड ते दोन कोटी रुपयाची गुंतवणूक केली. एकत्र व्यवसायामुळे जीवघेणी स्पर्धा राहिली नाही. शिस्तबद्धता असल्याने पर्यटन वाढलं आणि पर्यटकही वाढले. पर्यटकांनाही आता चांगली सुविधा मिळू लागली. या व्यवसायातून हे तरुण आज महिना प्रत्येकी ४० ते ५० हजार रुपये मिळवत आहेत.
हेही वाचा – कासव पिल्लांचा `येथे` जन्मसोहळा
आदर्श सर्जेकोट पॅटर्न
हा आदर्श सर्जेकोट पॅटर्न म्हणून उभा राहिला आहे. सर्जेकोटमधील श्री. खवणेकर, दादा सावजी यांनी यात पुढाकार घेतला आहे. त्यांनी तरुणांना योग्य मार्गदर्शन केले. ज्या बोटी मच्छीमारीसाठी वापरल्या जात होत्या त्याच आज पर्यटनासाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे मत्स्य दुष्काळाचा कोणताही फटका सर्जेकोटमधील मच्छीमारांना बसलेला नाही. उलट तिथे तरुण स्वयंपूर्ण झालेत. हा आदर्श इतर गावांनी घेण्यासारखा आहे.सर्जेकोटमधील प्रसाद पाटील, रघुनंदन खडपकर, सुनील खवणेकर, शैलेंद्र सावजी, संदीप शेलटकर, विवेक खडपकर, शंकर मुबरकर, संभाजी पराडकर, संतोष शेलटकर, विनायक आरोलकर, नितीन परुळेकर, जानू सावजी, गंगाराम आडकर, भिवा आडकर, मुरारी सावंत, रामचंद्र पराडकर, गोपीनाथ तांडेल यांनी एकत्र येऊन हा आदर्श निर्माण केला आहे.
हेही वाचा – विसरलेले लायसन्स मिळाले फेसबुकमुळे, कसे ?
नवी स्थळे पर्यटकांच्या नजरेत
खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता तारकर्ली, देवबाग असंच इथलं पर्यटन सीमित राहिले होते. सर्जेकोटपासून तळाशील अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तळाशीलच्या किनारपट्टीवर अवघ्या पाच ते सात मिनिटांत पोहोचता येतं. तळाशीलची स्वच्छ किनारपट्टी पर्यटकांना आकर्षित करीत असते. मात्र, इथे व्यावसायिक तत्त्वावर पर्यटन वाढत नसल्याने हे पर्यटन स्थळ दुर्लक्षित होते. सर्जेकोटमधील तरुणांनी एकत्र येऊन बनविलेल्या या सर्जेकोट पॅटर्नमुळे हे पर्यटन स्थळ आता ‘ओपन’ झाले आहे. पर्यटकही येथे आकर्षित होत आहेत. साहजिकच, सर्जेकोट पॅटर्नमुळे इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
अडीच ते तीन किलोमीटरवर कवडा रॉक
सर्जेकोटपासून अडीच ते तीन किलोमीटरवर कवडा रॉक हे ठिकाण आहे. साधारण सिंधुदुर्ग किल्ल्यासारख्याच काही एकरमध्ये पसरलेल्या या बेटावर तटबंदी मात्र नाही. ‘कवडा रॉक’ पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय देखणे ठिकाण आहे. या ठिकाणी स्थानिक तरुण सहली काढतात. तिथे जेवणाचा आनंद घेतात. मात्र, पर्यटकांच्या दृष्टीने हे ‘कवडा रॉक’ अजून प्रसिद्ध झालेले नाही. या ठिकाणी सुसज्ज जेटी झाल्यास पर्यटक येथे पोहोचू शकतील. शासनाने कवडा येथे जेटी उपलब्ध केल्यास सर्जेकोटचा विकास आणखी गतिमान होईल.
– दादा सावजी, रहिवासी, सर्जेकोट

News Story Feeds