कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्गात (Sindhudurg Ratnagiri) कालपासून पुन्हा जोर धरलेल्या पावसाने आचरा पारवाडी, कालावल खाडींना पुर आल्याने खाडीकिनाऱ्या लगतच्या भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. भातशेती पाण्याखाली जाण्याबरोबरच या भागातील ग्रामस्थांच्या अंगणात पाणी आले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता या भागातील ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. याचबरोबर रत्नागिरीतील अर्जुना आणि कोदवली नद्यांना पुन्हा एकदा पूर आला आहे. राजापुर तालुक्यातील म्हाळुंगे मधलीवाडी येथे गत आठवड्यात जमीन खचण्याचा प्रकार घडला. त्यामध्ये संतोष माळगवे यांच्या घराला तडे जावून जमीनही खचून घराची इमारत एका बाजूला कलंडली गेली आहे. कोकणातील पावसाचे हे चित्रण. sindhudurg-ratnagiri-heavy-rain-update-photo-story-akb








Esakal