आपण एखाद्या शहराला कसे भेट देणार? तिथे कसे पोहोचणार?, असा विचार करत असाल, तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण, आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही सहजरित्या तुमची सुट्टी एन्जाॅय करु शकता आणि तेही कमी वेळात. आपण फक्त आपली बॅग पॅक करणे, विमानाचे तिकीट बुक करणे आणि प्रवास करणे आवश्यक आहे.
सालेम, तामिळनाडू (Salem, Tamil Nadu) : तिरुमनिमुथारू नदीकाठी वसलेल्या या शहराला चेन्नईतून थेट विमानाने पोहोचू शकता. या प्रवासाचा कालावधी 50 मिनिटे आहे.शिमला, हिमाचल प्रदेश (Shimla, Himachal Pradesh) : भारतातील सर्वाधिक पसंतीच्या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी आपण दिल्लीहून थेट फ्लाइट पकडू शकता. या प्रवासाचा कालावधी 1 तास 25 मिनिटे आहे.म्हैसूर, कर्नाटक (Mysore, Karnataka) : दक्षिण भारतातील या सुंदर शहराला भेट देण्यासाठी तुम्ही चेन्नईहून फ्लाइट बुक करु शकता. या प्रवासाचा कालावधी 1 तास 20 मिनिटे आहे.नाशिक, महाराष्ट्र (Nashik, Maharashtra) : गोदावरी नदीकाठी वसलेलं हे प्राचीन शहर आपल्या द्राक्षांच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. येथे येण्यासाठी मुंबई, पुण्यातून आपल्याला थेट फ्लाइट उपलब्ध होऊ शकते. कुल्लू, हिमाचल प्रदेश (Kullu, Himachal Pradesh) : तुम्ही या हिल स्टेशनला कोणत्याही अडचणींशिवाय सहज भेट देऊ शकता. यासाठी आपण दिल्लीतून विमान प्रवास करु शकता. या प्रवासाचा कालावधी 1 तास 20 मिनिटे आहे.ग्वाल्हेर, मध्य प्रदेश (Gwalior Madhya Pradesh) : ग्वाल्हेर शहराचा समृद्ध वारसा आपण विमानाने अनुभवू शकता. तत्पूर्वी आपण इंदौरला जावून, तेथून थेट विमान प्रवासाचा आनंद घेऊ शकता. या प्रवासाचा सरासरी फ्लाइट कालावधी 1 तास 25 मिनिटे आहे.