छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य लाभलेला ‘पट्टा किल्ला’ म्हणजेच ‘विश्रामगड’. जालन्याची लढाई जिंकून रायगडाकडे जात असताना मुघलांनी राजांची वाट अडवली. तेव्हा बहिर्जी नाईक यांच्या चातुर्याने मुघलांच्या हातावर तुरी देत महाराजांनी पट्टा किल्ला गाठला. किल्ल्यावरील नैसर्गिक वातावरण आणि हवामान महाराजांना आल्हाददायक वाटल्याने तब्बल ३५ दिवस महाराजांनी तेथे वास्तव्य केले. क्षीण घालवणारा किल्ला म्हणून महाराजांनी पट्टा किल्ल्याचे ‘विश्रामगड’ असे नामकरण केले.
निसर्गाचे वरदान लाभलेल्या या किल्ल्यावरून पावसाळ्यात तर मानमोह असे दृश्य दिसते. रस्त्याने ठिक-ठिकाणी पाण्याचे ओहळ आणि डोंगर माथ्यावरून कोसळणारे छोटे-मोठे धबधबे, त्या धबधब्यांच्या वाहत्या पाण्याचा नजारा आणि हिरवळीने बहरलेला निसर्ग मनाला आकर्षित करतो. अशा निसर्गाच्या सानिध्यात किल्ल्याची अनुभूती घेण्यासाठी दुर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि पर्यटक गडावर येत असतात.








Esakal