महाराष्ट्रातल्या अनेकांचे फोन चोरून ऐकले जातायत असाही आरोप

मुंबई: “देशातील अनेक बड्या लोकांचे फोन टॅप केले गेल्याची माहिती आहे. अश्विनी वैष्णव हे देशाचे टेलिकॉम मंत्री आहेत. त्यांचाच फोन टॅप होतो ही धक्कादायक बाब आहे. त्यातही महत्त्वाचं म्हणजे ते मंत्री नसताना त्यांच्यावर पाळत ठेवली जाते. आणि आता ते माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री आहेत. खासदार असताना अशा लोकांवर पाळत ठेवली गेली?”, असा थेट प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला विचारला. तसेच, हा प्रश्न देशाच्या सुरक्षा व गोपनियतेशी निगडीत आहेत त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबद्दल स्वत: जनतेला नीट माहिती द्यावी, असेही त्यांनी सुचवले. (Sanjay Raut express concern over Pegasus Phone Hacking Tapping Racket Telecom Minister Ashwini Vaishnaw)

Also Read: “त्यात काय मोठा पराक्रम?”; राणेंचा ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल

“आमची नावं यामध्ये दिसत नसली तरीही आमचीही नावं त्यात असणार याची आम्हाला खात्री आहे. हळूहळू जशी नावं समोर येतील तेव्हा त्यात महाराष्ट्रातील अनेक जणांची नावं असतील हे नक्की. महाराष्ट्रातही पेगाससचा १०० टक्के वापर झालाच आहे. आम्हाला रोखण्याकरता ही यंत्रणा वापरली गेली असावी आणि यापुढे वापरली जात असावी असं मला वाटतं”, असे ते म्हणाले.

Also Read: “हे बा विठ्ठला, जसे मुख्यमंत्री तुझ्या भेटीला आले तसेच…”

Sanjay Raut

“पेगाससच्या सहाय्याने बड्या नेत्यांचे, पत्रकारांचे फोन टॅप आणि हॅक केले गेलेत. यामागे आंतरराष्ट्रीय ताकत आहे असं सांगणं केंद्र सरकारने बंद करावं. कारण इस्त्रायलमधून हे करण्यात आलं आहे आणि इस्त्रालय भारताचा चांगला मित्र आहे. इस्त्रायलचे नेत्यानाहू हे मोदींचे चांगले मित्र आहेत. नेत्यानाहूंच्या प्रचाराच्या वेळी मोदींचे पोस्टर लावलेले जगाने पाहिलेत. त्यामुळे या टॅपिंगमागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे अशा बाता मारणं केंद्राने बंद करावं”, असं रोखठोक मत त्यांनी मांडलं.

Also Read: पॉर्न फिल्म रॅकेट: राज कुंद्राने बनवला H accounts नावाचा WhatsApp ग्रुप; वाचा सविस्तर

“या देशातील पत्रकारांसह अनेकांचे फोन टॅप केले गेले. चोरून अनेकांचं बोलणं ऐकण्यात आलं. या चोऱ्यामाऱ्या बंद करण्याची गरज आहे. कारण हा केंद्राने देशाशी केलेला हा विश्वासघात आहे. हे फार मोठं षडयंत्र आहे. सरकारी मदतीशिवाय अशा प्रकारचे धाडस कोणीही करू शकत नाही”, असेही राऊत म्हणाले. “या देशात  कुणी  सुरक्षित  नाही. आमचे  फोन सगळे ऐकतात, असं आता नागरिकांनाही वाटू लागलंय. त्यामुळे आमच्यावर  पाळत ठेवली आहे अशी त्यांची भावना आहे. मोदी, शाह यांनी  समोर यावे आणि याचे उत्तर द्यावे. मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षाची बैठक बोलावली आहे. संसदेत शिवसेना या मुद्द्यावर नक्कीच निषेध नोंदवेल.”, असेही त्यांनी सांगितले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here