10 वी बोर्डाच्या परीक्षेपूर्वी नेमबाजीचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून जिने बंदुकीशी मैत्री करण्याचे पक्के केले ती म्हणजे राही सरनोबत. त्यावेळी भारताची अनुभवी तेजस्वीनी सावंत हिने रायफल प्रकारात एक वलय निर्माण केले होते. कुस्तीची पंढरी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये एकामागून एक नेमबाज घडतील, अशी कल्पनाही त्यावेळी कोणी केली नसेल. पण तेजस्विनीच्या पावलावर पाउल टाकत राही घडत गेली. नवं नवे विक्रम करुन तिने पिस्टल प्रकारात आपला विशेष ठसा उमटवला.

आठवी-नववीला NCC ला असताना राहीने आपल्या कुटुंबियांना नेमबाजीतील आवड बोलून दाखवली. 10 वीच्या बोर्डाची परीक्षा झाल्यावर बघू, असे म्हणत घरच्यांनी ती वेळ मारुन नेली. बोर्डाचे पेपर झाल्यावर राहीने ही गोष्ट लक्षात ठेवून घरच्यांना पुन्हा नेमबाजीबद्दल विचारणा केली. कोल्हापूरातच तिने सुट्टीच्या काळात असलेला कॅम्प जॉईन केला.

ट्रायलमध्ये अव्वल कामगिरी करत राही लक्षवेधी कामगिरी करत राहिली. सुरुवातीला तिने 10 मीटर पिस्टल प्रकारात हात आजमवला. त्यानंतर 2008 मध्ये 25 मीटर पिस्टल प्रकारातही ती लक्षवेधी ठरली. पुण्यातील युथ गेम्समध्ये राहीनं गोल्डन कामगिरी करुन दाखवली. तिचा हा प्रवास दिवसागणिक बहरत गेला.

कोएशिया वर्ल्ड कप स्पर्धेतील गोल्डन कामगिरी

ऑलिम्पिकपूर्वी क्रोएशिया येथील वर्ल्ड कप स्पर्धेत 25 मी एअर पिस्टल प्रकारात कोल्हापूरच्या राहीनं सुवर्ण पदकाची कमाई केलीये. या स्पर्धेत राहीनं 40 पैकी 39 गुण मिळवत अव्वल कामगिरीची नोंद केली. तिने फ्रान्सच्या माथिल्डे लामोले (31) हिला मागे टाकले. दोघींमधील गुणांचे अंतर राहीला आगामी स्पर्धेतील कामगिरीसाठी फायदेशीर ठरेल.

रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

राही सरनोबत 25 मीटर पिस्टल प्रकारात खेळते. या इवेंटमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारी ती पहिली भारतीय महिला आहे. याशिवाय आशियाई क्रीडा प्रकारातही सुवर्ण पदक पटकावणारी महिला महिला नेमबाज ठरली होती. तिच्या नावे असलेल्या खास विक्रमामुळे यंदाच्या स्पर्धेत तिच्याकडून सुवर्ण पदकाची आस आहे.

ऑलिम्पिकचा अनुभव असल्याने दबाव कमी

30 वर्षीय नेमबाज 21 व्या वर्षी पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत उतरली होती. लंडन ऑलिम्पिंक गेम्समध्ये तिने 19 स्थान पटकावले होते. पहिल्या ऑलिम्पिकचा अनुभवसोबत असल्यामुळे यंदाच्या स्पर्धेत तिच्यावर मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा दबाव नसेल. त्यामुळे तिला लक्षवेधी कामगिरी करण्यावर फोकस करणे सहज शक्य होईल.

Olympics 2020 : … म्हणून नीरजकडून पदकाची अपेक्षा

जागतिक क्रमवारीत अव्वल

ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाही होण्यापूर्वी 25 मीटर पिस्टल प्रकारात जागतिक नेमबाजीच्या क्रमवारीत राहीने अव्वलस्थानी झेप घेतली आहे. दिल्ली येथे मार्च- एप्रिलमध्ये झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेपूर्वी राही जागतिक यादीत अकराव्या स्थानी होती. या स्पर्धेनंतर राहीने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली. कोएशियातील सुवर्ण पदकासही ती टॉपला पोहचली आहे. त्यामुळे ती ऑलिम्पिकमध्ये गोल्डन कामगिरी करेल, असे वाटते.

7 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य

राही सरनोबत हिने आपल्या कामगिरीतील सातत्याने अनेक विक्रम आपल्या नावे प्रस्थापित केले आहेत. विशेष म्हणजे तिने सर्वाधिक 7 सुवर्ण पदक मिळवली असून 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकाची कमाई केली आहे. या आत्मविश्वासाच्या जोरावर जगातील मानाच्या स्पर्धेतही ती नवा विक्रम प्रस्थापित करेल, असे वाटते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here